नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह प्रारंभ

नांद्रा येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह प्रारंभ

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहर)- येथे अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह दिनांक ०६ सप्टेंबर वार सोमवार रोजी प्रारंभ झाला आहे या प्रसंगी विधीवत पूजाअर्चा व होमहवन करण्याचा सन्मान गावातील महादेव मंदिर संस्थानचे जेष्ठ विश्वस्त ह भ प उत्तम गोकुळ बाविस्कर यांना मिळाला आहे दररोज रात्री ८.वा संकीर्तन कार्यक्रम संपन्न होणार या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची सांगता दिनांक 13 सप्टेंबर वार सोमवार रोजी होणार आहे सकाळी ५.वा काकड आरती व ९.वा काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.सात दिवसाचा पूजाअर्चा विधी सोहळा कार्यक्रम गुर्रुवर्य दिनकरजी खुरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.कार्यक्रम यशस्वी तेसाठी महादेव मंदिरा संस्थान कमिटी अध्यक्ष सुभाष ञ्यबँक पाटिल,सचिव बापुसर सूर्यवंशी सर्व सभासद,महादेव भजनी मंडळ,महिला भाजनी मंडळ,शिवतेज भजनी मंडळ,ग्रामस्थ व तरुण वर्ग परिश्रम घेत आहेत.