महावितरण जळगाव मंडळ कार्यालय येथे अधिक्षक अभियंता म्हणून मा. अनिल महाजन यांची पदोन्नती

महावितरण जळगाव मंडळ कार्यालय येथे अधिक्षक अभियंता म्हणून माननीय श्री अनिल महाजन साहेब यांची पदोन्नती

 

महावितरण जळगाव मंडळ कार्यालय येथे अधिक्षक अभियंता म्हणून माननीय श्री अनिल महाजन साहेब यांची पदोन्नती वर पदस्थापना मिळाल्यानंतर रूजू झाले आहेत.संघटनेचे वतीने त्यांचे स्वागत अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी कॉ.विरेंद्रसिंग पाटील परिमंडळ सचिव जळगाव तथा राज्य संयुक्त सचिव, केंद्रीय महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्या श्रीमती संध्या पाटील मैडम, परिमंडळ प्रसिद्धी प्रमुख जळगाव तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ.देविदास सपकाळे,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा सर्कल प्रमुख जळगाव कॉ.प्रकाश कोळी,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा विभागीय सचिव सावदा कॉ.जितेंद्र अस्वार, माजी सर्कल अध्यक्ष कॉ.भगवान सपकाळे, ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ.व्ही.एन.तायडे, विभागीय सचिव जळगाव कॉ.किशोर जगताप, विभागीय सचिव भुसावळ,कॉ.रवि गायकवाड, विभागीय संघटक कॉ.किरण भोई,कॉ.सचिन फड,कॉ.गणेश सोनार, विभागीय प्रसिद्धी प्रमुख कॉ.गिरिष बर्हाटे, उपस्थित होते*
*सर्वांचा परिचय कॉ.विरेंद्रसिंग पाटील यांनी करून दिला.जळगाव परिमंडळ मध्ये सर्व चांगल्या व कर्तव्यदक्ष अधिकारी अभियंता यांच्या परंपरेत आपल्या कर्तृत्वशैलीने नवीन उच्चांक प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आमच्या संघटनेचे वतीने शुभेच्छा आहेत आणि सदैव सहकार्य आहे असे प्रतिपादन केले.वर्कर्स फेडरेशन संघटनेचे पदाधिकारी माननीय श्री कृष्णा भोयर साहेब सरचिटणीस यांच्या चांगल्या कार्यपद्धतीचा आम्हाला परिचय असून श्री अरूण म्हस्के साहेब उपसरचिटणीस यांच्या शी परिचय आहे.सर्व संघटना सहीत आपल्या संघटनेला सुध्दा प्रशासनाचं नेहमी सहकार्य राहील व उभय बाजूने राहावे अशी अपेक्षा माननीय अनिल महाजन साहेब यांनी व्यक्त केली*कामकाजात अत्यावश्यक बाबतीत महत्वाचे विषयावर लक्ष केंद्रित करून आपल्या सर्वांना लक्ष्य प्राप्ती साठी प्रयत्न शील राहावे लागेल असे मत साहेब यांनी मांडले असता.कॉ.प्रकाश कोळी यांनी प्रत्येक प्रश्नाला योग्य ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. कॉ.देविदास सपकाळे यांनी सामुहिक जबाबदारी आहे आणि जळगाव सर्कल आणि झोन चे लौकीक वाढीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.
कॉ.जितेंद्र अस्वार यांनी सभासद पदाधिकारी यांना भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणं अत्यावश्यक आहे असे मत मांडले असता परस्पर समन्वयाने आपण सर्व मिळून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन साहेबांनी दिले.लवकरच आपण तक्रार निवारण समिती चे बैठकीचे आयोजन करण्याचे नियोजन करित आहोत असे आश्वासन दिले‌ कॉ.सागरराज कांबळे सर्कल प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन जळगाव