पाचोरा व भडगाव तालुक्यातील पत्रकारांना एक चर्चेचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी यांनी निशुल्क एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

पाचोरा व भडगाव तालुक्यातील पत्रकारांना एक चर्चेचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी यांनी निशुल्क एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 

पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा व भडगाव तालुक्यातील पत्रकारांना एक चर्चेचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा निर्मल सिड्सच्या संचालिका वैशाली सुर्यवंशी यांनी निशुल्क एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन निर्मल इंटरनॅशन स्कुल येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पत्रकार कार्यशाळा मार्गदर्शन करताना सकाळ समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपले विचार मांडले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तर प्रमुख पाहुणे म्हणून देशदुतचे संपादक हेमंत आलोने, दैनिक पुण्यनगरीचे संपादक विकास भदाने, दैनिक सकाळचे ब्युरो चीफ सचिन जोशी, दैनिक देशोन्नतीचे संपादक मनोज बारी, निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या अध्यक्षा वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसीह सूर्यवंशी, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपक राजपूत, उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, युवा सेनेचे संदीप जैन उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना उत्तम कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपले विचार मांडले यात भांडवलशाही व सत्ताधाऱ्यांचा पत्रकारीतेवर दबाव असून मनमोकळेपणाने काम करण्यास मर्यादा येत आहेत यामुळे सद्य स्थितीत कॉर्पोरेटिव्ह पत्रकारीता सुरू आहे, पत्रकारांनी नेहमी पत्रकारीता करतांना डायरी सोबत ठेवावी कारण डायरी ही त्याचा आत्मा व स्वास आहे. पत्रकाराला समाजातील विविध घटकांकडून शब्द वाढविता. कारण याच शब्दाचे सामर्थ्य बातमिला बलवान करते यामुळे समाजाकडून पत्रकारांकडून निःपक्षपाती पत्रकारीता होण्याच्या अपेक्षा असतात असे सांगितले. वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकार हा निःपक्षपाती, निर्भिड व लढवय्या असावा, कारण पत्रकारांच्या लेखनिमूळे सामाजिक क्रांती घडू शकते पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा धारदार व बंदुकीच्यागोळीपेक्षा वेगवान असायला हवी. सोशल मीडियाच्या वाढता प्रकोप पाहता बातमीदाराने जबाबदारी लक्षात घेऊन वास्तव पत्रकारिता करण्याचा दृष्टिकोन ठेवावा, यासाठी शब्दांचा भांडार अपेक्षित आहे.

उत्तम कांबळे पुढे बोलताना म्हणाले की, पत्रकारिता हे शस्त्र असून त्याचा वापर मीरवेगिरी करिता न करता समाजातील धगधगत्या प्रश्नाना वाचा फोडण्यासाठी करा, पत्रकारांची भूमिका, बातमी म्हणजे काय? लेख, वार्तापत्र, अग्रलेख म्हणजे काय ? पत्रकारांची जबाबदारी आणि त्यातील बारकावे , इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यातील बदलते प्रवाह यासह विविध पत्रकारितेचे बदलते संदर्भ व इतिहास अश्या विविध विषयाबाबत सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैष्णवी पाटील यांनी केले. यावेळी रवि चौरपगार, निर्मल इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गणेश पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रदिप सोनवणे, गणेश पाटील, संतोष पाटील यांचेसह पाचोरा, भडगाव, तालुक्यातील सोशल मिडिया, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया चे पत्रकार बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.