नगरदेवळा येथे शेरे मैसूर शहीद टिपू सुलतान जयंती साजरा

नगरदेवळा येथे शेरे मैसूर शहीद टिपू सुलतान जयंती साजरा

संपूर्ण जगात प्रथमच क्षेपणास्त्र प्रक्षेपण करणारे व इंग्रजांची लढताना आपल्या देशासाठी प्राण देणारे स्वातंत्र्यसैनिक शहीद टिपू सुलतान यांची जयंती नगरदेवला येथे साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच अरुण आबा काटकर हे होते. कार्यक्रम मध्ये अब्दुल गनी सेठ, व अन्नू मेंबर यांची प्रमुख उपस्थिती होती.हया वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी दाखवले की अमेरिकेत नासा मध्ये ज्या भारतीय मिसाईल मेन ची चित्र लावलेले आहे तो शेरे मयसूर टिपू सुलतान आहे. ही गोष्ट प्रत्येक भारतीय साठी गौरवची आहे. टिपू सुलतान यांनी शिक्षण, व्यापार, विज्ञान, अनुसंधान, व्यवस्थापन, प्रशिक्षित नौदल, आंतरराष्ट्रीय संबंध, यावर आपले उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. यावेळी शिवसेना नेते वैशालीताई सूर्यवंशी यांनी टिपू सुलतानचे चित्र असलेली पाठी उपलब्ध करून दिली व या पाठीचे अनावरण अरूण आबा काटकर यांचे हाताने करण्यात आला.या कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी हाजी गनी सेठ,अन्नू मेंबर,अली रजा खान, हारून खान,मूशताक खान, वसीम मिर्झा, अहतेशाम रजा,कामरान खान,आवेश बागवान,अफरोज खान, शाहिद बेग, फाइक बागवान, शेर खान, शकील शेख,शफीक शेख, फैजान शेख,परवेज शेख,हसीबूर शेख, आफिन शेख, अरशद बेग, शोएब खान, दानिश बागवान,बाबू खान, शारुख बेग यांनी परिश्रम घेतले.