श्री. गो.से हायस्कूल, पाचोरा शाळेच्या दर्शनी फलकावर प्रभू श्रीराम अवतरले

श्री. गो से हायस्कूल, पाचोरा शाळेच्या दर्शनी फलकावर प्रभू श्रीराम अवतरले

 

पी. टी.सी. संचलित श्री. गो से हायस्कूल, पाचोरा शाळेच्या दर्शनी फलकावर श्री राम प्रभु अवतरले.500 वर्षानंतर 22जानेवारी 2024 ह्या मंगल दिनी रामलल्ला आपल्या मुलस्थानी म्हणजेच अयोध्या नगरीत भव्य अश्या, मनमोहक मंदिरात विराजमान झाले आहे.त्या निमित्त भारतात सर्वदूर आनंदी वातावरण आहे. सर्वानसाठी हा दिवस सर्वात मोठा सण आहे.
त्याच मोठ्या सणाचे औचित्य साधून श्री. गो से हायस्कूलचे कलाशिक्षक श्री सुबोध मुरलीधर कांतायन सर यांनी शाळेच्या ब्लॅकबोर्ड वर श्री राम प्रभु खडूच्या माध्यमातून चित्रित केले आहे. चित्राचे बारीक निरीक्षण केल्यास भरपूर अश्या विविध चित्रण आपल्याला यात दिसून येते. त्यापैकी पहिले म्हणजे चित्रात दोन रामाच्या कलाकृती साकारल्या आहेत यात त्असे दाखवायचे आहे की डाव्या बाजूला असलेले राम वनवासातील राम असून आजू बाजूला झाडी दाखवली आहे आणि ते 500 वर्षानंतर आपल्याला जन्मस्थानी अयोध्या त्या वास्तूत जातांना पहात आहेत.
राम सेतू अजूनही अस्तित्वात आहे. तो सरळ भव्य अश्या राममंदिर पर्यंत दाखविला आहे.. श्री राम येणार पण सोबत सिता आणि लक्ष्मण पण येणार… म्हणून श्री रामा सोबत डाव्या बाजूला सिता यांचे पाऊल गुलाबी रंगात व उजव्या बाजूला लक्ष्मणाचे पाऊल नारंगी पिवळ्या रंगात दाखविण्याचा प्रयन्त केला आहे. या आनंदाने आकाशही विविध रंगात न्हाहून निघालंय.पी टी सी संस्थेचे चेअरमन नानासो संजयजी वाघ, व्हा. चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन श्री. खलील दादा देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन श्री. वासुभाऊ महाजन,
मुख्याध्यापिका सौ. पी. एम वाघ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एन आर ठाकरेसर,पर्यवेक्षक श्री आर. एल. पाटीलसर , श्री. ए. बी अहिरेसर , सौ ए. आर. गोहील मॅडम सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी कांतायन सरांचे कौतुक व अभिनंदन केले.पाचोरा परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुबोध मुरलीधर कांतायन, कला शिक्षक
श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा