आरक्षणासाठी गरजवंत मराठ्यांची फौज घेऊन जरांगे पाटील यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

आरक्षणासाठी गरजवंत मराठ्यांची फौज घेऊन जरांगे पाटील यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

(सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) मराठा समाजाला सरसकट कुणबीचे आरक्षण द्यावे म्हणून आरक्षणासाठी गरजवंत मराठ्यांची फौज घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने आगेकूच करीत आहेत.त्यांच्या सोबत लाखो मराठे आप आपल्या वाहनातून आपल्याला लागणारी सर्व सर्व रसद घेऊन मुंबई कडे निघालेले आहेत.सरकारने धनगर आणि मराठा समाजाला वेळोवेळी नुसती पोकळ आश्वासने दिली आहे.आंतरवली सराटे येथुन निघून गेवराई, पाथर्डी तालुक्यातील सर्व गावात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील निघालेल्या फौजेचे प्रत्येक गावात जोरदार स्वागत करण्यात आले होते. आरक्षणासाठी प्रचंड घोषणाबाजी करत आणि सरकारच्या दरबारात आपलं म्हणणे मांडण्यासाठी मराठा समाज आता भलताच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.मी लढायला आणि मरायला कधीच घाबरत नाही.सामंजस्याची भुमिका घेतली होती म्हणून मी सरकारला सात महिन्यांचा वेळ दिला होता.महाराष्ट्र सरकारने कुणबी नोंदीचे सर्वेक्षण केले असता एकून ५४ लाख नोंदी आढळून आल्या आहेत तरीही सरकारी कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून आम्हाला हा टोकाचा संघर्ष करावा लागत आहे. सर्व लवाजमा घेऊन मुंबईला जाण्यासाठी घोषणा केली तरीही सरकारी गांभीर्याने विचार करीत नाही.अडीचशे हुन जास्त जणांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या जिवाचे बलिदान दिले आहे तरीही सरकार आरक्षणाकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे.ईतक निर्दयी सरकार असु शकत का असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला विचारला आहे.सरकारला धनगर आणि मराठ्यांनी गादीवर बसविले आहे.पण सरकारने आरक्षणासाठी मराठा आणि धनगर समाजाला झुलवत ठेवले आहे.आरक्षण दिले असते तर मुंबईला जाण्याची वेळ आली नसती.मुंबईत काही झाले तरी चालेल पण आरक्षण घेतल्या शिवाय मागे हटणार नाही असा एल्गार जरांगे पाटील यांनी पुकारला आहे.मी जिवंत असेल किंवा नसेल पण मराठ्यात फुट पडून द्यायची नाही.आता छातीवर गोळ्या जरी झाडल्या तरी मागे हटणार नाही असा पवित्रा घेऊन जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत रवाना झाले आहेत.वाहनांची वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरील रांंग सर्व रस्ते बंद करीत आहेत.सरकारने तातडीची बैठक बोलावून घेऊन चोवीस जानेवारी रोजी आपला निर्णय प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजले आहे.जरांगेच्या मराठी फौजा पाहुण सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . पाथर्डी तालुक्यातील राजळे, ढाकणे, घुले, काकडे, दौंड, अकोलकर, लवांडे या सर्व नेत्यांनी मुंबई कडे निघालेल्या फौजेचे प्रत्येक गावात जोरदार स्वागत केले आहे.