पाचोऱ्यात नगरपालिका प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन काम मार्गी लावले

अखेर त्या जुन्या कोर्टा जवळील खड्ड्याचे काम दिलेल्या तक्रारीचे नगरपालिका प्रशासन यांनी त्वरित दाखल घेऊन काम मार्गी लावले

( पाचोरा प्रतिनिधी – अनिल आबा येवले )
पाचोरा येथील जुन्या कोर्टाजवळील चारी बाजूने जाणारा रस्ता जवळ नगरपालिकेने पंधरा दिवसापासून खड्ड्याचे काम करण्यासाठी काम चालू केले होते पण ते काम त्यांनी चालू न करता खड्डा तसाच राहिला होता त्यामुळे त्या खड्ड्यात रोज येणारे जाणारे महिला पुरुष वयस्कर विद्यार्थी यांचे हाल होत होते बरेच जण त्या खड्ड्यात पडून जखमी होत होते त्याची दाखल सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले यांनी घेऊन त्वरित नगरपालिका प्रशासन सौ शोभा बाविस्कर मॅडम यांना तक्रार देऊन यासंदर्भात त्या परिसरातील नागरिकांचे निवेदन दिले त्यावर नगरपालिका मुख्याधिकारी यांनी तातडीने स्वतः पाहणी करून नगरपालिका इंजिनियर श्री ईश्वर सोनवणे व सहाय्यक इंजिनियर श्री मनोज पाटील यांनी त्वरित तो खड्डा बुजून रहिवाशांना जाण्या येण्याचा मार्ग मोकळा केला यावेळी त्या परिसरातील नगरसेवक श्री दत्तात्रय जडे यांनी लक्ष दिले असून तातडीने काम मार्गी लागले असून नगरपालिका प्रशासनाचे आम्ही सर्व नागरिक आभार मानत आहे.