इगतपूरी – देवळाली – भुसावळ मेमू ट्रेन सकाळी धावण्या करता ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेने केली मागणी

इगतपूरी – देवळाली – भुसावळ मेमू ट्रेन सकाळी धावण्यासाठीच्या ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेने केलेल्या मागणीची दखल घेत ही मेमू सुरू होण्यासाठीचा प्रस्ताव भुसावळ विभागातून मुंबई मुख्यालय परिचालनकडे रवाना,

पाचोरा : प्रतिनिधी,

इगतपुरी/देवळाली – नासिक – भुसावळ कडे सकाळी सुटणारी एकही पॅसेंजर वा मेमू ट्रेन जळगांव/भुसावळ कडे येण्यासाठी उपलब्ध नसल्याने व्यापारी, विध्यार्थी, चाकरमान्यांसह, प्रवाशी वर्गाची चांगलीच गैरसोय होत असून ही देवळाली – नासिक – भुसावळ कडे सकाळी धावणारी पॅसेंजर ट्रेन कोरोनाकाळात दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेली असल्याने ही ट्रेन पुनश्च सुरू व्हावी यासाठी भुसावळ विभागाला दि.09/04/2022 रोजी ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे ट्रेन सुरू होण्याच्या मागणीचे पत्र देण्यात आले होते, त्यानुसार ही मेमू ट्रेन इगतपुरी/देवळाली येथून सकाळी जळगाव – भुसावळ साठी सुटावी जेणेकरून सकाळी जिल्ह्यातील ठिकाणी नौकरी, व्यवसाय, शिक्षण घेण्यासाठी जाणे सोईचे होईल, ही ट्रेन तात्काळ सुरू व्हावी यासाठी ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ट्रेन लाईव्ह न्यूज चे मुख्यसंपादक श्री. दिलीपभाऊ पाटील प्रयत्न करीत असून, पाटील यांनी संघटनेचे पत्र भुसावळ विभागाला दिल्यानंतर पाटील यांना भुसावल मंडळा तर्फे भुसावळ – देवळाली मार्गावर एक ट्रेन सुरू करण्यात आलेली असून आपण मागणीपर सुचविलेल्या ट्रेन चा प्रस्ताव योग्य त्या कारवाईसाठी भुसावळ येथून मध्य रेल्वेच्या मुंबई येथील परिचालन मुख्यालयाला पाठविण्यात आला आहे, त्यानुसार योग्य ती कारवाई करणे सोयीचे होईल, असे बी. अरुण कुमार मंडळ वाणिज्य प्रबंधक मध्य रेल भुसावळ यांचे पत्र आज दि.11/04/2022 रोजी पाटील यांना मिळाले आहे,
आता मुंबई मुख्यालयातून ही ट्रेन सुरू होण्यासाठी काय कारवाई केली जाते याकडे भुसावळ विभागातील सर्वच व्यापारी, विद्यार्थी, चाकरमान्यांसह प्रवाशी वर्गाचे लक्ष लागून आहे,

●【इगतपुरी/देवळाली कडून नासिक – भुसावळ कडे सकाळी सुटणारी ही ट्रेन मेमू स्वरूपात तात्काळ सूरू होऊन प्रवाशी वर्गाला दिलासा मिळावा हीच अपेक्षा तथा सूचना भुसावळ, मुंबई, दिल्ली रेल्वे विभागाला करतो, तसेच ही मेमू पुढील येत्या दिवसात लवकरच सुरू होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरूच राहील, – दिलीप पाटील, संस्थापक अध्यक्ष, ट्रेन लाईव्ह प्रवाशी संघटना】