पाचोरा येथील प्राथमिक शाळेचे बाल स्नेहसंमेलन उत्साहात

पाचोरा येथील प्राथमिक शाळेचे बाल स्नेहसंमेलन उत्साहात

पाचोरा – येथील माणिकराजे पवार ट्रस्ट संचलित प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन 2 डिसेंबर 2024 रोजी उत्साहात संपन्न झाले. कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रा. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पंडित कुंभार यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष तथा संस्थेचे विश्वस्त प्रा. रवींद्र चव्हाण यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या.

या स्नेहसंमेलन इयत्ता १ ली ते ८ वीच्या मुला मुलींनी आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन करत आनंदोत्सव साजरा केला.

नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने विद्यालयात 1 जानेवारी रोजी बाल क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात धावणे , लिंबू चमचा , एक मिनिट स्पर्धा, उंच उडी मिठाई स्पर्धा यासह अनेक गमतीशीर स्पर्धा झाल्या. कार्यक्रमानंतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती कल्पना पाटील, श्रीमती मनीषा चव्हाण, श्रीमती दिपाली दांडेकर, श्रीमती प्रणाली वाकचौरे, विजय पाटील, हेमराज पाटील, आर. ओ. पाटील, अभिषेक लांडगे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यालयातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.