ताजनापुर येथे लक्ष्मण महाराज पाटील यांच्या काल्याच्या किर्तनाने शनैश्वर जयंती जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

ताजनापुर येथे लक्ष्मण महाराज पाटील यांच्या काल्याच्या किर्तनाने शनैश्वर जयंती जन्मोत्सव सोहळ्याची सांगता

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌‌ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथे ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील यांच्या काल्याच्या किर्तनाने शनैश्वर जयंती जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली. श्रीक्षेत्र आळंदीचे निवासी गुरुवर्य ह.भ.प.लक्ष्मण महाराज पाटील यांनी यावेळी गोकुळीच्या सुखा,अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी,आनंदल्या नरनारी, गुढ्या तोरणे,करती कथा,गाती गाणे.आळंदीचे महान संत तुकाराम यांच्या काला प्रकरणातील अभंग या प्रसंगी निवडण्यात आला होता.भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळात झाल्या नंतर गोकुळ वासीयांना जो आनंद झाला त्या झालेल्या आनंदाचे वर्णन प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराजांनी केले आहे. परी पुर्ण अवतार हा श्रीक्रुष्ण भगवंताचाच आहे.भगवान श्रीक्रुष्णाचे चरीत्र सर्वांना उपयुक्त आहे.समुद्राची शाई केली आणि पृथ्वीचा कागद केला आणि प्रत्यक्ष सरस्वती देवी लिहीण्यास बसली तरी ते लिहीता येणार नाही ते अवर्णनीय आहे.या जगाची सृष्टी निर्माण व्हावी म्हणून भगवंताने देवाकडे प्रार्थना केली. जगात हींदू ही एकच जात आहे. माणसाला मनुष्य जन्म मिळाला आहे.चागल्या माणसाच्या संगतीत राहून जिवन जगा.हा मनुष्य जन्म पुन्हा मिळेल याची शाश्वती राहीलेली नाही.या विश्वातील सारे पाप पुण्य भगवंताला समजते.अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी १६६२ कोटी रूपयांचे गुप्त धन भाविकांनी दिले.त्याची भगवंताकडे नोंद आहे.रावण, शिशुपाल यांचा देवाने शत्रूत्वातुन उद्धार केला. नारद महर्षी यांनी कंसाला राजदरबारात जाऊन सांगितले की देवकीच्या पोटी जन्माला येणाऱ्या आठव्या बालकापासुन तुझा वध केला जाईल.म्हणून तू त्यांना जिवंत ठेवू नकोस.कंसाच्या हातुन पाप घडल्या शिवाय कंसाचा पापाचा घडा भरणार नाही. भगवान श्रीकृष्ण श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला बंदी शाळेतील वसुदेवाच्या वंशी आणि देवकीच्या पोटी जन्माला आले. ज्ञानी माणूस आज धनवानाच्या पुढे झुकत आहे.ही अधोगती आहे.परमार्थातल्या आनंदा मागे आनंदच आहे.भगवान श्रीक्रुष्णाने बालपणीच काग,बंग,रिठा या राक्षसांना मारले.आणि अवघी दैत्य खाण संपवून टाकली.वाळवंटात साधुसंतांनी केलेला काला आजही गावागावांतील धर्म मंडपात भाविक भक्तांना मिळत आहे.हे या अखंड हरिनाम सप्ताहाचे खास वैशिष्ट्य आहे.या अखंड हरिनाम सप्ताहात मृदुंगाचार्य म्हणून रवीदास कडुळे, हार्मोनियम वादक म्हणून भाऊसाहेब इथापे आणि गायनाचार्य ह.भ.प.बालसंस्कार केंद्र दहीफळ येथील वारकरी विद्यार्थी शिवाजी महाराज काळे,गोरक्ष महाराज राऊत,त्रिंबक महाराज घाडगे,रामकिसन महाराज व्यवहारे, शंकर ठोंबळ,विणेकरी अर्जुन वीर,किसन मैंदड,यांच्या सह या शनिजन्मोत्सव सोहळ्या प्रसंगी समस्त गावकरी व भजनी मंडळ आणि ताजनापूर पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.