सु.भा.पाटील प्रा.विद्या मंदिर ( भ.रोड विभाग ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु.भा.पाटील प्रा.विद्या मंदिर ( भ.रोड विभाग ) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शिक्षणाच्या स्वर्गाचे…
जिने उघडले दार….!!
तिच सावित्री …
आज् जगाची शिलेदार….!!

आज भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. या सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुखाध्यापक श्री.अशोक परदेशी सर व अध्यक्षस्थानी शाळेतील उपशिक्षिका श्रीमती.सुरेखा पाटील मॅडम होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती सांगितली. श्री दीपक पाटील सर यांनी वसा सावित्रीचा ही कविता सादर केली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक परदेशी सर यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई यांचा जीवनपट थोडक्यात व्यक्त केला. सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या नंतर महाराष्ट्र राज्याचे म.मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दीपक पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती. चारुशीला पाटील मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.