पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नवीन आदर्श प्राथमिक/माध्यमिक विद्यालय क्रमांक पटकावला
पाचोरा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवार दि.20.01.2023 रोजी न्यू इंग्लिश मेडीयम स्कुल पाचोरा येथे आयोजित केले होते. त्यात गिरणाई शिक्षण संस्था संचलित नविन आदर्श माध्यमिक विद्यालय पाचोरा येथील प्राथमिक गटात
प्रज्वल महालपुरे std 8
माध्यमिक गटात
यश चावरे std 9
या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला त्यांच्या उपकरणाची जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे. त्यांना शाळेतील विज्ञान शिक्षिका श्रीमती अल्पा एम. सायाणी(कोटेचा ) यांचे मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी पाचोरा विभागाचे प्रांतधिकारी मा.श्री. विक्रम बांदल साहेब, तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे साहेब, गटशिक्षणाधिकारी मा.श्री. गिरीष जगताप साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती. सरोज गायकवाड मॅडम व इतर मान्यवर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मा.तात्या साहेब.पंडितराव शिंदे, व सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा शिंदे मॅडम, व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद यांनी कौतुक केले आहे.