पाचोऱ्यात शुक्रवारी ‘भीमसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन; उपस्थितीचे आवाहन

पाचोऱ्यात शुक्रवारी ‘भीमसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन; उपस्थितीचे आवाहन

पाचोरा(वार्ताहर) दि,२८
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त
सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता बस स्थानका शेजारील नागसेन नगर भागात नासिक येथील सूरज्योती ऑर्केस्ट्राच्या ‘भिमसंध्या’ या प्रबोधनात्मक गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नागरिकांनी या संगीत रजनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात आमदार किशोर अप्पा पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते समाज सुधारकांच्या प्रतिमा पूजनाने होणार असून प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, उद्योजक मुकुंद बिलदीकर, पिटीसी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, आगार व्यवस्थापक नीलिमा बागुल, प्राचार्य वासुदेव वले, प्राचार्य बी डी बोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी नागरिकांनी या भिम गीतांच्या प्रबोधमात्मक कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्राह्मणे, सचिव मिलिंद तायडे, खजिनदार राजू सोनवणे, उपाध्यक्ष आकाश नन्नवरे, दीपक खैरे अनुराग खेडकर, अमोल पवार सागर गायकवाड, आकाश थोरात कमलेश अहिरराव, अमोल कदम यांचेसह समिती सदस्यांनी केले आहे.