बास्केटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या धैर्यशील पाटील याचा सौ.वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार.

बास्केटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या धैर्यशील पाटील याचा सौ.वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार…!

पाचोरा:- बास्केटबॉल स्पर्धेत अतिशय चमकदार कामगिरी करून राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या धैर्यशील पाटील याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पाचोरा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सत्कार केला.धैर्यशील पाटील याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बास्केटबॉल संघात निवड झालेली आहे.सौ वैशालीताई सुर्यवंशी यांनी धैर्यशील पाटील याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्याची ही देदीप्यमान कामगिरी पाचोराच नाही तर संबंध जिल्ह्यासाठी, खान्देशासाठी भूषणावह आहे. पाचोराच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवण्याचा मान धैर्यशील पाटील याला मिळाला आहे.राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बास्केटबॉल स्पर्धेत अशीच उत्तुंग कामगिरी करून पाचोरा, जळगाव तसेच महाराष्ट्राचे नाव लौकिक करून गरुडझेप घेण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.धैर्यशील पाटील याचे वडील श्री रामेश्वर पाटील कृषी सहाय्यक, पाचोरा यांचा देखील सत्कार यावेळेस करण्यात आला.याप्रसंगी
मा.श्री उद्धव मराठे उपजिल्हाप्रमुख, मा.श्री.शरद पाटील तालुकाप्रमुख, अँड दीपक पाटील शहरप्रमुख, मा.श्री अनिल सावंत शहर प्रमुख,मा.श्री.अँड अभय पाटील, भरत खंडेलवाल, दादाभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, मनोज चौधरी, हरीश देवरे, चंद्रकांत पाटील, पप्पू जाधव, संजय चौधरी,गफार भाई, निखिल सोनवणे, जयश्री येवले, अनिता पाटील, मंदाकिनी पारोचे, कल्पना पुणेकर, पूजा पाटील, सीमा पाटील,मनीषा पाटील, ममता पाटील, संगीता पाटील, आबासाहेब भीमराव पाटील,मालू पाटील, सोनवणे, अरुण तांबे, नाना वाघ, अँड किशोर पाटील, नंदू पाटील (सर),गणेश पाटील, डी.डी नाना, शुभम पाटील, आकाश महाजन, चेतन भावसार आदी कार्यकर्ते तसेच विविध पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.