राहुरी पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकास पंधरा हजारांची लाच घेताना अँटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले !

राहुरी पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षकास पंधरा हजारांची लाच घेताना अँटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले !

‌ (सुनिल नजन/ चिफ ब्युरो/ अहमदनगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर ) नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी राहुरी पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकास पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ज्ञानदेव नारायण गर्जे, सहायक पोलिस उपनिरीक्षक राहुरी पोलिस स्टेशन, राहणार भाग्योदय रो हौसिंग सोसायटी, तपोवन रोड,राजबीर हाॅटेल समोर, मुकबधीर विद्यालया जवळ, अहमदनगर. तक्रारदार हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे “आय एम मोटवानी वाईनशाॅप” येथे नोकरीस आहेत.ते लिकरचा सप्लाय करतात.तक्रारदार यांच्या मोटवानी वाईनशाॅप मध्ये नगर जिल्ह्यातून येणाऱ्या लिकर खरेदी करणाऱ्या ग्राहकावर व तक्रारदार यांना गुन्ह्यात आरोपी करून दुकानाचा परवाना रद्द करण्याची धमकी देऊन तक्रारदार व त्यांच्या ग्राहकावर पोलिस कारवाई न करण्यासाठी सदर पोलीस उपनिरीक्षकाने दरमहा 20,000 रुपये लाचेची मागणी केली.तडजोड करून 15000, रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारलीही .सदर रक्कम पंचासमक्ष स्विकारताना लोकसेवक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव नारायण गर्जे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यांच्या विरोधात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर मॅडम, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी, वाचक पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक श्रीमती निलिमा केशव डोळस, यांनी सापळा रचून त्या पथकात पोलिस नाईक संदिप हांडगे, शिपाई सुरेश चव्हाण यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.जिल्ह्यातील कोणत्याही खात्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा यांच्या वतीने खाजगी ईसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (०२४१)२४२३६७७ किंवा नाशिक येथील (०२५३)२५७८२३० किंवा १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.गेल्या पाच वर्षांत राहुरी पोलिस स्टेशनमध्ये एकूण दहा पोलिस अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.ही माहिती या मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात थेट विधानसभेत दिली आहे.एकूणच राहुरी पोलिस स्टेशनचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.