Home महाराष्ट्र जी स्वप्न घेऊन अक्षय मैदानात उतरला ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या...

जी स्वप्न घेऊन अक्षय मैदानात उतरला ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

जी स्वप्न घेऊन अक्षय मैदानात उतरला ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

२२३ राहुरी विधानसभा मतदार संघातीत पोट निवडणुकीत जी स्वप्न घेऊन अक्षय कर्डिले हा मैदानात उतरला आहे ती सर्व स्वप्न मी पुर्ण करणार,या निवडणुकीत दिलेले मत हे स्व.शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केले.ते राहुरी येथे गणपती मंदिरा समोर झालेल्या निवडणुकीतील प्रचार सभेत बोलत होते. या प्रचार सभेस व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे,पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे,पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,आमदार मोनिकाताई राजळे,आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे,आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार खताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,श्रीमती अलकाताई कर्डिले, अण्णासाहेब बाचकर,वैभव खलाटे,संतोष शिंदे,राजू मामा तागड हे उपस्थित होते.मुख्यमंत्री विकास कामावर बोलताना पुढे म्हणाले की पुढील काळात मुळा धरणातील गाळ काढून तिन टीएमसी पाणी साठा वाढवू. मी आज तुम्हाला आश्वासीत करतो की मी शिवाजी रावा पेक्षा दीडपट प्रेम करून अक्षय कर्डिले यांनी मागितलेली गोष्ट कधीच कमी पडू देणार नाही.तसेच राहुरी कृषी विद्यापीठाची एक हजार एकर जागा काढून ती जागा एम आय डी सी साठी देऊन मोठ्या प्रमाणावर तरूणांच्या हाताला काम मिळवून देवू.तसेच संरक्षण प्रकल्पासाठी ही जिल्ह्यात इतरत्र जागा उपलब्ध करून देऊ.एस टी डेपो, उड्डाणपूल, या सर्व मागण्यां बरोबर राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक अक्षय कर्डिले यांना देऊन चाललो आहे.तसेच पुढील काळात शेतकऱ्यां साठी १०० टक्के दिवसा मोफत वीज देवू.विजबीला पोटी एक रुपया ही घेणार नाही.लाडकी बहिण योजना सुरूच राहणार आहे.तसेच सुशिक्षित बेरोजगार स्टेनोग्राफर यांनी भर सभेत काळ्या अक्षरांच्या पाट्या दाखवून आपले म्हणणे मांडले ते बरोबर आहे त्यांच्या मागण्या बाबदही योग्य विचार करू. असे सांगितले.स्वर्गिय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सांगण्या वरून मी वांबोरी चारी साठी सव्वाशे कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले.माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली म्हणून त्यांचे ही भर सभेत आभार मानले.तसेच या निवडणुकी तील प्रचार सभेचे चोख नियोजन केले म्हणून सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचेही कौतुक केले.आमदार विक्रम पाचपुते,आमदार राजळे,सभापती ना.राम शिंदे,ना.पंकजा मुंडे,ना.राधाकृष्ण विखे पाटील आणि उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपले विचार व्यक्त केले.या सभेस झालेली प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी शेवटी उपस्थितांना असं आवाहन केलं की अक्षय कर्डिले यांना तिन चतुर्थांश मतांनी निवडून द्या. आभार सत्यजित कदम यांनी मानले.

Don`t copy text!