महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी जितेंद्र सिंग राजपूत.
दोंडाईचा प्रतिनिधी-गोपाल कोळी..
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गोविंद जी वाकडे, राज्य संघटक संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष निलेश जी सोमानी, राज्य उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा, राज्य कार्यकारी सदस्य प्रा. जसपाल सिह सिसोदिया यांच्या आदेशाने व सूचनेनुसार नाशिक विभागीय अध्यक्षपदी जितेंद्र सिंग राजपूत यांची नियुक्ती केली असून यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी रायसाकडा, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने, आबा येवले. संदीप परमार, प्रदीप महाले, आदी उपस्थित होते.
राज्यातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, या संघटनेची ओळख सर्व दूर झालेली आहे. संजयजी भोकरे, डॉ.वि श्वासराव आरोटे यांचे नेतृत्वात पत्रकार संवाद यात्रा काढून पत्रकारांचे विविध प्रश्न जाणून घेत ते शासन दरबारी डॉ.विश्वासराव आरोटे यांनी प्रभावीपणे मांडून पत्रकारांचे विविध प्रश्नांना वाचा फोडला.
नाशिक विभागातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी लढा उभारणार-जितेंद्र सिंग राजपूत.
नाशिक विभागात येणाऱ्या नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांचे पेन्शन सन्मान योजना, आरोग्य, विमा, शिक्षण यास विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी शासन स्तरावर लढा उभारून शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल. लवकरच दिनांक एक मे 2025 रोजी नाशिक विभागीय अधिवेशन धुळे येथे आयोजित करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन जितेंद्र सिंग राजपूत नियुक्तीप्रधान समारंभात केले आहे.