
शिरापूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी आमचे घरकुल का होउन देत नाही म्हणून मागासवर्गीय कुटुंबाला हातपाय मोडेपर्यंत बेदम मारहाण
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सवाची संपूर्ण देशभर जय्यत तयारी सुरू असताना अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे मात्र मागासवर्गीय शेलार,वैरागर कुटुंबातील पाच जणांना हातापायाची हाडे तुटेपर्यंत जोरदार मारहाण करण्यात आली.आमचे घरकुल का होउन देत नाही असे म्हणत हा प्रकार घडला आहे.याबाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच म्हणजे १४ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ३६१/२०२६ भारतीय न्याय संहितेचे कलम ११८(१),११८(२),१८९(२),१९०, १९१(२),१९१(३) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबद भाऊसाहेब कुंडलिक शेलार, राहणार शिरापूर, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्याद दाखल केली असून त्यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की मी वरील ठिकाणी पत्नी सरोजिनी,मुलगा शिवम्,मुलगी श्वेता असे सर्व जण एकत्र राहतो.मी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे.डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास मी माझ्या घरात असताना मला माझ्या घराबाहेर प्रचंड आरडा ओरडा ऐकू आला होता म्हणून त्यावेळी मी घराबाहेर जाऊन पाहिले असता आमच्या गावातील ईसम नवनाथ काशिनाथ शिरसाठ याच्या घरासमोर माझा भाउ रावसाहेब कुंडलिक शेलार यास १) राजेंद्र नवनाथ शिरसाठ,२) निलेश नवनाथ शिरसाठ,३) मंगल नवनाथ शिरसाठ,४) शितल राजेंद्र शिरसाठ, ५) कैलास एकनाथ शेलार,६)शाम शहादेव शेलार हे सहा जण माझा भाउ रावसाहेब कुंडलिक शेलार यास मारहाण करताना म्हणत होते की “तु आमचे घरकुल का होउ देत नाहीस” असं म्हणत निलेश नवनाथ शिरसाठ आणि राजेंद्र नवनाथ शिरसाठ यांनी हातातील लाकडी दांडक्याने माझ्या भावाच्या डाव्या हातावर,पाठीवर मारून जखमी केले. त्याच वेळी मी त्यांच्या मध्ये भांडण सोडविण्या साठी गेलो असता निलेश नवनाथ शिरसाठ यांने माझ्या डाव्या कानावर मारुन जखमी केले आहे.त्याच वेळी हौसाबाई कुंडलिक शेलार या वयोवृद्ध आई सुद्धा हे भांडण सोडविण्या साठी मध्ये आल्या असता त्यांना मंगल नवनाथ शिरसाठ हिने तीच्या हातातील लाकडी दांडक्याने डाव्या पायावर मारुन जखमी केले.तसेच हा आरडा ओरडा पाहून लता दाजिबा वैरागर ही भगिनी भांडण सोडविण्या साठी मध्ये आली असता तीला सुद्धा मंगल शिरसाठ व शितल शिरसाठ यांनी हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली.तसेच माझा मुलगा शिवम् भाऊसाहेब शेलार यास निलेश शिरसाठ व राजेंद्र शिरसाठ यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली.त्या नंतर आमच्या कुटुंबातील व्यक्तींना सदर मारहाणीत गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे पाहून वरील लोकांनी तेथुन काढता पाय घेतला व लगेचच निघून गेले. व जाताना आम्हाला म्हणाले की तुम्ही जर पुन्हा आमच्या नादी लागले तर आम्ही तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली आहे.म्हणून माझी वरील लोका विरोधात फिर्याद आहे.असे पोलिस दप्तरी दिलेल्या ऑनलाईन फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी पुढील तपास हे पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब हे करीत आहेत.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सवाची सुरुवात होण्यापूर्वीच ही तुफान हाणामारी झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.ऐन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच म्हणजे १४ एप्रिल रोजी ही फिर्याद दाखल झाल्या मुळे विषेशत: आंबेडकरी प्रेमी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.या दोन्ही कुटुंबात अनेक दिवसांपासून पुर्व वैमनस्याची आग धुमसत होती त्याचा परिणाम असा झाला आहे.असे दवाखान्यात उपचार घेत असलेल्या जखमींनी सांगितले.























