महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा वर्धापन दिन उत्साहात

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा वर्धापन दिन उत्साहात

पाचोरा – राज्यातील अप्लावधीत लोकप्रिय ठरलेली वित्तीय संस्था म्हणून नावाजलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा 14 वा वर्धापन दिन काल तारीख 20 रोजी बँकेच्या पाचोरा येथील शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला.

पाचोरा येथील भडगाव रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत ग्राहकांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या तर बँक व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

चौदाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 2 बचत गटांना कर्ज वितरित करण्यात आले. त्यावेळी महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचे महत्त्व सांगून ते सुद्धा काढून घेण्यात आले.

वर्धापन दिनानिमित्त सकाळी प्रभात फेरी काढून विविध ग्राहकांच्या भेटीतून बँकेत असलेल्या विविध कर्ज योजनाची माहिती देण्यात आली. वर्धापन दिनाच्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बँकेचे शाखाधिकारी श्री गणेश वानखेडे, बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक श्री प्रसाद दुसाने, बँकेचे लिपिक श्री विशाल सूर्यवंशी, व सौ सपना हिवरे, व शाखेचे शिपाई श्री अजय महाजन यांनी परिश्रम घेतले. सर्व ग्राहकांनी बँकेच्या उपलब्ध असलेल्या विविध सोयींची व कर्जाची आपल्या गरजेनुसार फायदा घ्यावा याचे आव्हान शाखा व्यवस्थापक गणेश वानखडे यांनी केले. बँकेत आलेल्या ग्राहकांनी यावेळी मनोगत व्यक्त करून बँकेत असलेल्या सोनेतारण कर्ज व गृह कर्ज यासंदर्भात आपले आभार व्यक्त केले. त्यांनी बँकेने त्यांना वेळोवेळी मदत केली असून इतर ग्राहकांना पण आम्ही त्याची माहिती देऊ असे सांगितले. याप्रसंगी पाचोरा येथील मान्यवर व्यापारी, दुकानदार, वित्तीय क्षेत्रातील प्रतिष्ठितांनी बँकेस भेट देऊन व्यवस्थापक व कर्मचारी वर्गाला शुभेच्छा दिल्या.