Home पाचोरा पाचोरा येथे “राजश्री ऑनलाईन सेंटर”चे उत्साहात उद्घाटन

पाचोरा येथे “राजश्री ऑनलाईन सेंटर”चे उत्साहात उद्घाटन

पाचोरा येथे “राजश्री ऑनलाईन सेंटर”चे उत्साहात उद्घाटन

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष मा. किशोरभाऊ रायसाकडा यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या “राजश्री ऑनलाईन सेंटर” या CSC केंद्राचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या ऑनलाईन सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व खासगी ऑनलाईन सेवा तसेच नोटरीसंबंधित कामे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
या सेंटरचे उद्घाटन विद्यमान नगरसेवक (शिवसेना शिंदे गट) प्रवीण भाऊ ब्राम्हणे तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ, मुंबई उपप्रदेश अध्यक्ष किशोरभाऊ रायसाकडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास भुनेश दुसाने, राकेश सुतार, विनोद तायडे, विशाल हटकर, राजश्री ऑनलाइन सर्विसेसचे प्रो. गौतम सोनवणे, गौतम साळवे, अन्वर शेख, कुंदन बेलदार, गजानन पाटील, विजय बदलांगे, राजेंद्र पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याच निमित्ताने किशोरभाऊ रायसाकडा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १८ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी. एन. चौधरी सर, डॉ. योगेश पाटील तसेच ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी रायसाकडा मित्र परिवाराकडून रक्तदात्यांचा प्रमाणपत्र, गोल्ड मेडल व फळे देऊन सन्मान करण्यात आला. एकूणच किशोरभाऊ रायसाकडा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

Don`t copy text!