श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे विविध कार्यक्रम संपन्न.

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे विविध कार्यक्रम संपन्न.
पा. ता. सह. शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 2 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन नानासो.श्री. संजय वाघ,मा.डॉ.श्री. नितीन बच्छाव साहेब शिक्षणाधिकारी( माध्य)जि. प.जळगाव, संस्थेचे संचालक आप्पासो.श्री. सतीश चौधरी, दादासो.श्री. योगेश पाटील,मुख्याध्यापिका सौ. पी.एम. वाघ मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व दप्तराचे वाटप करण्यात आले.
शिक्षणाधिकारी मा. श्री.नितीन बच्छाव साहेब यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या ग्रंथालय व संगीत हॉलचे उद्घाटन करण्यात आले.
वरील सर्व मान्यवरांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.