पाचोर्‍यातील प्रभाग क्रमांक एकमध्ये करण पाटलांचा प्रचार

पाचोर्‍यातील प्रभाग क्रमांक एकमध्ये करण पाटलांचा प्रचार

 

पाचोरा, दिनांक ९ ( प्रतिनिधी ) : वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रभाग क्रमांक एकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांचा आज जोरदार प्रचार करण्यात आला.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या पाचोरा-भडगाव मतदारसंघातील प्रचाराची धुरा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिग सुर्यवंशी यांनी समर्थपणे सांभाळली आहे. मतदारसंघातील कान्याकोपर्‍यात त्या मशालचा जागर करत आहेत.

 

या अनुषंगाने आज वैशालीताई सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक एक आणि परिसरात जोरदार प्रचार केला. त्यांनी या प्रभागातील प्रत्येक नागरिक तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांशी वैयक्तीक वार्तालाप करत परिवर्तनासाठी करण बाळासाहेब पाटील यांच्या मशाल या निशाणीला मतदान करण्याचे आवाहन केले.

 

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, आप आदी पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.