सय्यद जलालुद्दीन बाबा रहमतुल्लाह अलैह – गोराडखेडा संदल गुरुवारी व उरूस शुक्रवारी
जिल्हा जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे विश्रांती घेत असलेले सूफी संत सय्यद जलालुद्दीन रहमतुल्लाह तआला अलैह यांचा उरूस शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. याच्या एक दिवस आधी, गुरुवारी संदलचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.गेल्या 300 वर्षांपासून सुरू असलेल्या या उरूस शरीफला राज्यभरातून मोठ्या संख्येने आपली आस्थाव श्रद्धा अर्पण करण्यासाठी येतात. लोक येथे आपल्या नवस-संकल्प व मनोकामना मांडतात. सय्यद जलालुद्दीन बाबा रहमतुल्लाह अलैह यांचा उरूस हा धार्मिक कार्यक्रमांसोबतच हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे एक उत्तम उदाहरण आहे. येथे दरवर्षी मुस्लिमांसह इतर धर्मांचे लोकही मोठ्या संख्येने श्रद्धा व्यक्त करण्यासाठी येतात.दरवर्षीप्रमाणे यंदाही एक दिवस आधी, म्हणजे गुरुवारी, परचम कुशाई (ध्वजारोहण) होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यासाठी बाहेरून कव्वाल येणार आहेत. शनिवारी कुस्तीचा कार्यक्रम होणार असून त्यात स्थानिक तसेच परिसरातील पैलवान सहभागी होतील.बाहेरून येणाऱ्या जायरिनांना कोणतीही अडचण येऊ नये वो कोणततीही अनुचित घटना घडू नये यासाठी उरूसपूर्वीच गोराडखेडा खुर्द व बुद्रुक या दोन्ही गावांच्या ग्रामपंचायती आणि पाचोरा पोलीस विभागाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून कडक नजर ठेवली जाणार आहे.दरगाह कमिटी चे पदाधिकारी, गावचे सरपंच, पोलीस पाटील व प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उरूसमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दरगाह समितीचे अध्यक्ष सैयद शकील व सदस्य जलील सैयद, मुश्ताक सैयद, सततार सैयद, मजीद सैयद, सैयद अरबाज़, शेख इस्माईल, सैयद सादिक, सैयद मुबीन, आरिफ शेख, अलीम शेख, अनीस शेख, आशिक सैयद, सैयद अमीन, मुजाहिद सैयद, सैयद मुईन, मुस्तफा शेख, अरबाज़ शेख, आरिफ शेख, फिरोज सैयद, रईस शेख, सरपंच सुधीर रायबा पाटील, सरपंच ज्ञानेश्वर येबडा पाटील, रामचंद्र पाटील, पोलीस पाटील चंद्रकांत तानाजी पाटील, व गावातील जबाबदार व्यक्तींनी केले आहे.

























