मयत डॉ संपदा मुंडेवर रुग्णांचे पोस्ट मार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला यांची चौकशी व्हावी: पांचगणे कुटुंबाची जिल्हा उप अधीक्षका कडे तक्रार
! (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे या महिला डॉक्टरने २३ तारखेला आत्महत्या केली. त्रास देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची आणि इतरांची नावे त्यांनी हातावर लिहून ठेवली होती. त्यांच्यावर चार वेळा बलात्कार झाला. शारीरिक व मानसिक शोषण केले. एक pm रिपोर्ट बदलावा या साठी त्यांच्यावर दबाव होता अस त्यांच्या घरच्यांचे म्हणणे आहे.यात एका खासदारांच्या पीए चे ही नाव आहे. प्रशासनाच्या शोषणाच्या त्या बळी ठरल्या. त्यांनी या बाबतीत वरिष्ठांना तक्रार केली होती मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.परिणामी शोषणाला कंटाळून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. २६ वर्षे वय असलेल्या या
तरुण वयातल्या ऐन उमेदीच्या काळात डोक्यात भविष्याची स्वप्ने बाळगणाऱ्या लेकी बाळींचे झालेलं शोषण आणि त्या पायी येणाऱ्या नैराश्यातून तीला आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलावे लागणे ही महाराष्ट्रातल्या प्रशासनाला लाजवेल अशी लाजिरवाणी गोष्ट घडलेली आहे. प्रशासन आणि प्रशासनातील अधिकारी आणि अधिकाऱ्याच्या आडून आमदार, खासदार हे सर्व सामन्य महिलांचे शोषण करत असतात. अनेक उमद्या तरुणांच्या स्वप्नांचा बळी इथली ही किडलेली व्यवस्था घेत असते. प्रामाणिक पाणाने काम करणाऱ्या लोकांना ही किडलेली व्यवस्था आणि या व्यवस्थे आडून भ्रष्टाचारी नेते एकतर त्यांचा बळी घेतात किंवा त्यांना सतत त्रास देऊन बदली करून त्यांच्यातील कर्तव्य दक्षतेची उमेदच मारून टाकतात.
महाराष्ट्रातील प्रशासन त्यातल्या त्यात पोलिस प्रशासन हे अत्यंत निर्ढावलेले आहे.महाराष्ट्रातील संतोष देशमुख,महादेव मुंढे हत्या प्रकरणाने पोलिस प्रशासनाचा आणि पुढाऱ्यांनी पोसलेल्या राजकीय गुंडांचा , राजकारण्यांचा खेळ अवघ्या तमाम महाराष्ट्राने पाहीला आहे. आजकाल अनेक वर्षांपासून सर्वसामान्य लोकांची कामे करण्यापेक्षा आमदार खासदार ,मंत्री, संत्री यांची हुजरेगिरी करण्यात महाराष्ट्र पोलिसांचा हात कोणीही धरू शकणार नाही.
सर्व सामन्यावर लोकांवर दादागिरी करणारे आणि त्यांच्या तक्रार रीची दखल न घेता साहेबांचा फोन आला की त्यांची पडलेली कामे करायला तयार असतात. महाराष्ट्रातील अनेक पोलिस हे सरकारने पाळलेले अधिकृत सरकारी गुंड असून सरकारचा हप्ता गोळा करणे , मंत्र्या संत्र्याचा बंदोबस्त करणे , वरून फोन आला की अंन्यायग्रस्त लोकांची तक्रार न घेता त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, नोंदवलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष करने अनेक प्रकारची अनैतिक कामे करणे हे आजकालच्या पोलिसांचे काम झाले आहे.यात त्यांचा दोष नाही एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील (आबा) यांच्या पोलिस खात्याने एका आमदारालाच काळे निळे होई पर्यंत धोपटले होते. तो ही विद्यमान आमदार असताना
आणि आज महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे. आज गृह खाते पोलिसांना फक्त आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापरत आहे.
यामध्ये योग्य तो बदल होणे अत्यंत गरजेचे आहे. पोलिसांकडून सामन्यांना न्याय नाही मिळाला तरी चालेल पण कोणावरही अन्याय होऊ नये हीच महाराष्ट्रातील आम जनतेची अपेक्षा आहे. लोकांचं रक्षण नाही झाले तरी चालेल पण शोषण होऊ देता कामा नये .
गृहमंत्र्यांनी त्या दोन पोलिसांवर केलेल्या तुटपुंज्या कारवाईने त्या संपदा मुंडे या डॉक्टर मुलीचा जीव परत घेऊन येईल का ?
तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण होत असताना तिच्या अर्जाची दखल घेतली असती तर आज तीला आपला जीव गमवावा लागला नसता तर ती आजही हयात असती.
पोलिस प्रशासनच्या ताकदीचा योग्य वापर केला तर काय होऊ शकतं हे शिकण्या साठी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आदर्श घ्यावा.डॉ.संपदा मुंडे आणि पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने यांच्यात मयताचे पोस्ट मार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी सतत वाद होत होते.डॉक्टरांच्या या तक्रारीची वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी दखल घेतली असती तर हे रामायण महाभारत घडलेच नसते.आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून भाग्यश्री मारुती पचांगडे या महीलेने जिल्हा पोलिस उपअधीक्षक यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे की माझी मुलगी दिपाली हीचे लग्न लष्करी अधिकारी असलेल्या अजिंक्य हनुमंत निंबाळकर यांच्याशी झाले होते.माझी मुलगी दिपाली हीचा सासरच्या लोकांकडून वारंवार मारहाण करून सारखा अमानुषपणे छळ करण्यात येत होता.१९ऑगष्ट २०२५ रोजी दिपाली अजिंक्य निंबाळकर हीला फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण उपचारा दरम्यान दिपालीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.दिपालीचा मृत्यू नैसर्गिक नसून हत्याच आहे असा आरोप त्याच वेळी माहेरच्या मंडळींनी व्यक्त केला होता.तरीही अजिंक्य निंबाळकर यांनी पोलिसांचा वापर करून शवविच्छेदन अहवालात बदल केला.आणि थेट एक महिन्याच्या नंतर डॉक्टरांनी पोस्ट मार्टेम रिपोर्ट दिला.त्यामध्ये दिपालीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे नमूद करण्यात आले होते.निंबाळकर कुटुंबाच्या मारहाणीत दिपालीचा मृत्यू झाला हे निश्चित होते.पण सर्व प्रकारण घाई घाईने दडपून टाकण्यात आले होते.आणि मृत्यू अहवाल बदलण्यात आला होता.या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी मयत दिपाली अजिंक्य निंबाळकर हीची आई भाग्यश्री मारुती पचांगडे यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.याच अहवाल बदलण्यात डॉ संपदा मुंडे यांचा सहभाग होता त्यांना अहवाल बदलण्यासाठी निंबाळकर घराण्यातील पुढाऱ्यांचे दबाव टाकण्यासाठी सारखे फोन येत होते.असा आरोप पचांगडे कुटुंबानी केला आहे.आता पर्यंत किती बोगस रिपोर्ट बनवले याची कसुन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.फलटण उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अंशुमन धुमाळ यांनी सांगितले की जानेवारी २०२५ सालात या रुग्णालयात एकूण १३९ पोस्ट मार्टेम रिपोर्ट बनवण्यात आले आहे.त्यापैकी डॉ संपदा मुंडे यांनी त्यांच्या सहीने ३६ पोस्ट मार्टेम रिपोर्ट बनवले गेले आहेत.भाग्यश्री मारुती पचांगडे यांच्या विवाहीत मुलींची १७ ऑगष्ट रोजी हत्या झाली होती.तीचा पी.एम.रिपोर्ट चुकीचा आहे.त्यावर डॉ संपदा मुंडेंची सही होती.त्यांच्यावर पोलीसांचा आणि निंबाळकरांच्या राजकीय दबावामुळे त्यांना तसा रिपोर्ट बनवण्यास भाग पाडले होते.दिपाली ही चक्कर येऊन पडल्याचे सांगितले होते.अजिंक्यचा चुलत भाऊ सुजित निंबाळकर यांनी थेट दिपाली हीला दवाखान्यात दाखल केले होते. दवाखान्यात पी.एम.रिपोर्ट बनवण्या वरून शाब्दिक चकमक ही झाली होती.हा सर्व प्रकार निंबाळकर यांच्या जवळपास राहणारे सामाजिक कार्यकर्ते विक्रम वाघ यांनी उजेडात आणला आहे.आमची मुलगी दिपाली ही बी टेक इंजिनिअर झालेली होती.तीच्या मृत्यू अहवालात बदल झाला होता. आणि आता डॉ संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून हत्याच आहे.त्यातील दोषींना शिक्षा व्हावी असा आक्षेप त्यांनी घेतला आहे. दरम्यान न्यायालयाने डॉ संपदा मुंडे यांना मानसिक त्रास देणारा संशयित आरोपी प्रशांत बनकर याला २८ऑक्टोबर पर्यंत तर दुसरा संशयित आरोपी पीएसआय गोपाळ बदने याला तीस ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणी योग्य ती कारवाई होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे. नामदार पंकजा मुंडे यांनी मयत डॉ संपदा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन मयताच्या कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे.आणि मयत डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय शांत बसणार नाही असा विश्वास व्यक्त केला.आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ही प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की या प्रकरणात जे कोणी अडकले आहेत मग ते खासदार असोत, आमदार असो,त्यांचे पीए असो,पोलिस असो,डॉक्टर असोत ते सर्व जण या प्रकरणात प्रथम आरोपी झाले पाहिजेत. तसेच प्रथम डॉ. संपदा मुंडे यांच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या उप जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी,वरीष्ठ पोलिस अधिकारी,सुसाईट नोट मध्ये नमुद केलेल्या सर्व जणांना आरोपी करण्यासाठी आणि एस आय टी चौकशी साठी मी प्रयत्न करणार आहे.तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार आहे.आमच्या लेकराला बीडचे म्हणून कोणी हिनवत असेल आणि तो कोणीही असला तरी त्याला ही सोडणार नाही.आम्ही शेवट पर्यंत मयत डॉ संपदा मुंडेंच्या बाजूने उभे राहणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे.डॉ संपदा मुंडे यांच्या चौकशी प्रकरणात दररोज वेगवेगळ्या प्रकारची माहिती बाहेर येत आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.नेमकं सत्य काय आहे आणि ते कधी उघड होते.हे पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
























