प्रतापराव ढाकणे,चॉंद मनियार,आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बंडू पाटील बोरूडे यांनी काढले पाथर्डी नगर पालिकेच्या स्वच्छ कारभाराचे वाभाडे
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) गेल्या दहा वर्षात पाथर्डी नगरपरीषदेचा कारभार किती स्वच्छ होता. या स्वच्छ कारभाराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार गटाचे प्रांतिक सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, चॉंद मनियार, आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बंडू पाटील बोरूडे यांनी पत्रकारांना समवेत घेऊन पाथर्डी शहरातील विविध ठिकाणी झालेल्या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून केलेल्या कामाचे चांगलेच वाभाडे काढले आहेत.त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाथर्डी नगर परिषदेत अनेक प्रकारचे गैर व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. विषेशत: भुयारी गटार योजनेच्या गैर कारभाराची कागदपत्रे दाखवून चांगलाच पंचनामा करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यांनी पत्रकारांना सोबत घेऊन अनेक ठिकाणी भेटी दिल्या.आणि यावर पाथर्डी नगर परिषद प्रशासनाने कोट्यवधी रुपये कसे खर्च केले आणि या निधीची कशी वाट लावली या संदर्भातील कामा बाबतच्या वर्क ऑर्डर पत्रकार परिषदेत दाखवून गुजरातच्या काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या ठेकेदारांने गेल्या अनेक वर्षांत केलेल्या कामाची खुलेआम भांडाफोड केली. तसेच नगर परिषद प्रशासनाने नदी पात्रात एक कोटी रुपये खर्चून गटार बांधली त्या गटार योजनेच्या पाण्याचे फिल्टर करून ते स्वच्छ करून वापरणार होते. पण प्रत्यक्षात मात्र तेथे काहीच काम झाले नाही हे प्रतापराव ढाकणे आणि बंडू पाटील बोरूडे यांनी दाखवून दिले. तेथे टाकण्यात आलेल्या पाईपची माहिती देत एकूण २२५कोटी रुपये किंमतीची योजना कशी पाण्यात गेली तेही सांगितले.देवा पवार हे यावेळी उपस्थित होते.प्रतापराव ढाकणे म्हणाले की एवढ्या मोठ्या शासकीय निधीचे अपहरण करणारे कोण? अशा गैर कारभारात लोक प्रतिनिधी शिवाय शासकीय कर्मचाऱ्याची हिंमतच होत नाही.जर लोकप्रतिनिधी चे नियंत्रण नसेल तर “आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय” अशी अवस्था या पाथर्डी नगर पालिकेची झाली आहे.नगराध्यक्ष यांची जबाबदारी नाही का शासनाच्या आलेल्या निधीचा वापर योग्य प्रकारे होत आहे की नाही हे तपासून पाहण्याची. त्यामुळे आता पर्यंत दहा वर्षांत झालेल्या कामाचे सरकारी नव्हे तर पब्लिक ऑडिट आपण करणार असल्याचे प्रतापराव ढाकणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.विरोधी गटाने ही या मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.पाथर्डी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय भागवत यांनी नाट्यमय रीत्या घेतलेल्या माघारी मुळे तालुक्यात प्रचंड प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या आहेत.प्रतापराव ढाकणे यांनी आमदार मोनिकाताई राजळे यांचे नाव न घेता आमची बहीण म्हणूनच उल्लेख केला.पाथर्डी नगर परिषदेचा गेल्या दहा वर्षांत झालेल्या गैर व्यवहाराच्या आरोपांमुळे आता खरी निवडणुकीची रंगीत तालीमेची रणधुमाळी सुरू झाली आहे.रेंगाळलेली निवडणुक वीस डीसेंबर रोजी होणार आहे.या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.भाजप कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अभय आव्हाड हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.झालेल्या आरोपांना ते कसे तोंड देतात हे आगामी निवडणुकीत दिसून येणार आहे.
























