खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या दणक्याने रेल्वे प्रशासन खडबडले

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या दणक्याने रेल्वे प्रशासन खडबडले

वेस्टर्न डी आर एम अधिकाऱ्यांसह पाळधी रेल्वे गेटची पाहणी समस्याग्रस्त नागरिकांनी मांडल्या व्यथा आणि अपेक्षा
————————————–
पाळधी ता.धरणगाव – रेल्वे गेट क्र 153 कायमस्वरूपी बंद करून नवीन बोगदाचे काम मंजूर करण्यात आले असून सदर मंजूर ठिकाणी स्थानिक रहिवाशी तसेच परिसरातील सुमारे 25000 लोकांना अडचण निर्माण झाली होती. म्हणून सदर 25 गावांचे सर्व पक्षीय पदाधिकारी ग्रामस्थांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याशी स्थानिक पदाधिकारी यांनी संपर्क साधून काम बंद करण्याची मागणी केली होती.त्या अनुषंगाने खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या आदेशाने गेट उघडण्यात आले होते. डी. आर. एम.यांनी घटनास्थळावर भेट घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून जनतेच्या समस्या समजून त्यांना पर्यायाबाबत माहिती जाणून घेण्याबद्दल आदेश वजा सुचना दिल्या होत्या. *खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या दणक्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाल्याने आज प्रत्यक्ष पाहणी करून जनतेच्या समस्या समजून घेतल्याने पाळधीकरांची रेल्वे गेट समस्येतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे*.

आज पाळधी रेल्वे गेटवर दुपारी चार वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पश्चिम रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक जिव्हिएल सत्य कुमार यांच्यासह सर्व पर्यायांची निवड, फेर तपासणी केली. यावेळी ह.भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे,भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवले, पंचायत समिती सदस्य हर्षल चौधरी, निर्दोष पवार, सुनील मोरे सर, विकास पाटील, संदेश झंवर, प्रकाश ठाकूर, कैलास पाटील, कन्हैया रायपूरकर, अनिल पाटील, हसरत सोनवणे, लक्ष्मण पवार, ललित शिंपी, दिनेश पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर झंवर,चाळीसगाव पंस उपसभापती सुनील पाटील,पंस सदस्य रवींद्र चौधरी रेल्वेचे सह इ
एओएम रामेश्वर प्रसाद (नंदुरबार),महेंद्र पाटील (धरणगाव) रामप्रसाद भौमिक सह रेल्वेच्या इतर अधिकारी,परिसरातील नागरिक सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह परिसरातील नागरीक, महिला भगिनी युवक उपस्थित होते.

*खासदारांच्या दणक्याने पश्चिम रेल्वेचे मंडल रेल प्रबंधक जिव्हिएल सत्य कुमार यांच्यासह दोन तास संयुक्त पाहणी*
पाळधी गावातील व परिसरातील 25 गावांसह पन्नास हजार नागरिकांना गेट न 153 बंद केल्यास होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला भ्रमणध्वनी वरून तसेच दि 7 फेब्रुवारीच्या पत्रानव्ये नियोजीत बोगद्याच्या ऐवजी दुसऱ्या पर्यायाची पाहणी करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या डी आर एम सह इतर अधिकारी उपस्थित राहून नागरिकांसह सर्वानुमते ठरवण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी 4 वाजता पाहणी करण्यासाठी आदेशित केले होते. आज प्रत्यक्ष रेल्वेच्या सर्व पर्यायाची पायी चालत पाहणी केली. दरम्यान स्थानिक नागरिक तसेच परिसरातील 25 गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते, याप्रसंगी पाहणी दरम्यान गेट न 153 व्यतिरिक्त इतर 3 पर्याय उपलब्ध असून याबाबत सविस्तर चर्चा करून तांत्रिक बाबी लक्षात घेऊन अधिकारी स्तरावर पुन्हा एकदा इतर 3 पर्याय पैकी 1 पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी उपस्थितांच्या वतीने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तसे आदेश दिले. या बाबत गेट न 153 आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खासगी रस्ता असून बोगद्याच्या भिंती खासगी क्षेत्रात येणार आहेत तेंव्हा ती जागा अधिग्रहण करण्यासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा इतर पर्याय पैकी एक पर्याय उपलब्ध तो वापरावा. असे आदेश खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिले. त्याचप्रमाणे वाघलुद,चावलखेडे, भोणे ता. धरणगाव येथील बोगद्याच्या समस्याचे ही निवारणासाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आदेश दिले. पाळधी रेल्वे गेट न 153 बंद न करता इतर कोणत्याही पर्याय उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी तालुका उपाध्यक्ष किशोर झंवर यांचेसह परिसरातील नागरिकांनी लावून धरली, त्यास खासदार उन्मेश पाटील यांनी खंबीर भूमिका घेत उपस्थित जनसमुदायास आश्वस्त केले.