जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे दैदिप्यमान यश

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे दैदिप्यमान यश….!!!!

भडगाव (प्रतिनिधी) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील तब्बल ७ पहेलवानांनी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,तर्फे आयोजित तसेच तालुका क्रीडा संकुल,चाळीसगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १७ व १९ वर्षाआतील गटात विजेतेपद प्राप्त केले असून त्यांची धुळे व नाशिक येथे पार पडणाऱ्या नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेतील यशस्वी पहेलवान…!!!!

१) कृष्णा सुनिल पाटील (प्रथम,४५ कि. गट- १७ वर्षे)

२) धीरज शरद पाटील (प्रथम,५१ कि. गट- १७ वर्षे)

३) अक्षय भगवान माळी (प्रथम,७१ कि. गट- १७ वर्षे)

४) निवृत्ती ईश्वर पवार (द्वितीय ५० कि.ग्रीकोरोमन,गट- १७ वर्षे)

५) जय आत्माराम बिऱ्हाडे (प्रथम ६६ कि.गट- १९ वर्षे)

६) पायल कैलास सोनवणे (प्रथम ४५ कि.गट-१७ वर्षे)

७) पायल दौलत पाटील (प्रथम ५० कि.गट – १९ वर्षे)

यशस्वी खेळाडूंना आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय पंच प्रा.प्रेमचंद चौधरी,यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,अव्वर सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर,प्र.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.