जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे पालक सभा उत्साहात संपन्न
दत्तात्रय काटोले
उपक्रमांचे पालकांकडून कौतुक • ३० फुलझाडांची शाळेला भेट**
सोयगाव, दि. 25 नोव्हेंबर (प्रतिनिधी) :
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी मा. दिलीप कुमार स्वामी यांची दक्षसूत्री संकल्पना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे व केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले. पालकांची लक्षणीय उपस्थिती असलेली ही सभा उत्साहात संपन्न झाली.
सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रवींद्र काळे, उपाध्यक्ष मंगेश सोहनी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य हर्षल काळे, राजेंद्र दुतोडे, रवींद्र साखळे व अण्णा वाघ उपस्थित होते.
इयत्ता 1 ते 7 च्या विद्यार्थ्यांच्या सुमारे 300 पालकांनी सभेला हजेरी लावली.
मुख्याध्यापक किरणकुमार पाटील व सहशिक्षिका प्रतिभा कोळी यांनी पालकांना दक्षसूत्री उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
यामध्ये—
गुणवत्ता पूर्ण शिक्षण,
कौशल्याधारित व स्पर्धाक्षम विद्यार्थी घडविणे,
आनंददायी व नाविन्यपूर्ण अध्ययन,
IT सक्षम शिक्षण,
स्वअभिव्यक्ती, सर्जनशील लेखन,
स्वावलंबनाची जाणीव,
देशभक्ती व संस्कार मूल्ये,
100% उपस्थिती या मुद्द्यांवर भर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शाळेत सुरू असलेल्या शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा पूर्वतयारी,
परसबाग उपक्रम आणि तिचे महत्त्व,
विद्यार्थ्यांचे गुणोत्तर वाढीसाठी उपक्रम,
तसेच इको क्लब – ‘एक पेड़ माँ के नाम’ यासंबंधी पालकांना माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच शाळेत CCTV कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
पालक विष्णू मापारी यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. महिला पालकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती.
पालकांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करून काही सकारात्मक सूचना मांडल्या.
कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक—
सुरेखा चौधरी, पंकज रगडे, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, प्रतिभा कोळी, गणेश बावस्कर, पांडुरंग बारगजे, अंकुश काळे, मंदा मस्के आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज रगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगला बोरसे यांनी मानले.
सभेच्या शेवटी पालक व शिक्षकांनी शाळेच्या सुशोभीकरणाकरिता 30 फुलझाडांची रोपे भेट दिली.

























