शेअर मार्केट मधिल आरोपी कडून दीड कोटींची ऑनलाईन लाच स्वीकारणारे स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलिस अधिकारी निलंबित : पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची घोषणा 

शेअर मार्केट मधिल आरोपी कडून दीड कोटींची ऑनलाईन लाच स्वीकारणारे स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलिस अधिकारी निलंबित : पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांची घोषणा

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) शेअर मार्केट मधिल आरोपीला अटक न करण्यासाठी दीड कोटी रूपयाची ऑनलाईन पद्धतीने लाच स्वीकारणारे स्थानिक गुन्हे शाखेचे चार पोलिस अधिकारी निलंबित करण्यात आले असल्याची घोषणा अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी २१ जुलै रोजी केली.या बाबत मिळालेली माहिती अशी की शिर्डी येथील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या संचालकांनी शेअर मार्केट मध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एकूण आठ लाख रुपयांची फसवणूक करून ते पसार झाल्या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर २७३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२),३१८(४),३१६(२),३(५) या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याचा तपास अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी भुपेंद राजाराम सावळे (वय२७) राहणार नांदुर्खी रोड, श्रीकृष्ण नगर, शिर्डी, तालुका राहता,जिल्हा अहिल्यानगर, यांच्याकडे शेअर मार्केट घोटाळा तपासाच्या अनुषंगाने पोलिस चौकशी केली असता शेअर मार्केट मधिल चढ उतारामुळे मोठ्या प्रमाणात घाटा आल्यामुळे गुंतवणूक दारांचे पैसे पुन्हा माघारी मी वेळेवर देऊ शकलो नाही असे त्यांनी सांगितले.तसेच जनतेच्या ठेवी परताव्या बाबद माहिती विचारली असता सावळे त्यांनी सांगितले की १५ जानेवारी २०२५ रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव,व त्यांच्या सोबत असलेले तिनं कर्मचारी यांनी मी व माझे दोन भाउ आणि मित्र असे सर्व जण नाशिक कडे जात असताना लोणी गावाजवळ आम्हाला अडवून धाकराव साहेब मला म्हणाले की तुझ्या कडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे कोणत्याही प्रकारचे लायसन्स नसताना जनतेकडून पैसा गोळा करून जनतेची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावरच गुन्हा दाखल करतो.मी त्यांना म्हणालो की साहेब माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका.मी कोणाचीही फसवणूक केली नाही.मला विनाकारण कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवू नका त्यावर ते व त्यांच्या सोबत असलेले तिनं पोलिस कर्मचारी म्हणाले की “तुला जर या गुन्ह्यातून सही सलामत सुटायचे असेल तर तु आम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये दे “त्यावर मी धाकराव साहेब व त्यांच्या सोबत असलेल्या तिनं पोलिस कर्मचाऱ्यांना म्हणालो की माझ्याकडे रोख स्वरूपात पैसे नाहीत तर धाकराव साहेब व त्यांच्या सोबत असलेल्या तिनं कर्मचाऱ्यांनी मी माझे दोन भाऊ व मित्र या सर्वांना अहिल्यानगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील पार्किंग मध्ये घेऊन आले. तेथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी दीड कोटी रूपये द्या असे सांगितले.खोट्या गुन्ह्यात अडकण्या पेक्षा पोलिस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव साहेबांनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी दिलेल्या खात्यावर मी ऑनलाईन पद्धतीने दीड कोटी रूपये ट्रान्स्फर केले अशी आरोपीनी माहिती दिली असता त्या बाबदच्या तपासा दरम्यान चौकशी केली असता पोलिस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव आणि त्यांच्या सोबत असलेल्या तिनं पोलिस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सक्रुतदर्शनी दिसून आले आहे.सदर तपासी अधिकारी यांनी दिलेल्या तपास अहवालावरून आज दिनांक २१ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस सब इन्स्पेक्टर तुषार धाकराव, पोलिस अंमलदार १) पोलिस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर २१४५ मनोहर विलास गोसावी,२) पोलिस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर ४८६ बापुसाहेब रावसाहेब फोलाणे,३) पोलिस हेड कॉन्स्टेबल बक्कल नंबर १२९३ गणेश प्रभाकर भिंगारदिवे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्या नगर यांना “शासन सेवेतून निलंबित करण्यात आले” असून सदर बाबतची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली असून प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक डॉ शरद गोर्डे,नेमणूक आर्थिक गुन्हे शाखा यांच्या कडे देण्यात आली आहे.असे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेल्या शेअर मार्केट घोटाळ्यात आता पोलीसांचाही सहभाग असल्याचे दिसून आल्यामुळे “कुंपणानेच शेत खाल्यामुळे सर्व सामान्य लोकांनी आता न्याय मागायचा कोणाकडे” हा फार मोठा गंभीर प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झाला आहे. पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की शेअर मार्केट घोटाळ्यात जे जे दोषी सापडतील त्यांची कोणाचीही गय केली जाणार नाही.एल सी बी ने ही पैसे घेतले असतील तर त्यांच्या वर ही कडक कारवाई केली जाईल असे निक्षून सांगितले आहे.