मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या ११ विश्वस्ता पैकी ॲड. तानाजी धसाळ यांचीच पुन्हा फेरनिवड

मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या ११ विश्वस्ता पैकी ॲडव्होकेट तानाजी धसाळ यांचीच पुन्हा फेरनिवड

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथिल कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथिल प्रसिद्ध ॲडव्होकेट तानाजीराव धसाळ पाटील यांची पुन्हा एकदा नव्याने फेरनिवड झाली आहे. अहिल्यानगरचे धर्मदाय उप आयुक्त यांनी नुकत्याच कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या आकरा विश्वस्तांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.त्यामध्ये ॲडव्होकेट तानाजीराव धसाळ यांच्या नावाचा समावेश आहे.धसाळ हेच एकमेव जुने विश्वस्त आहेत.त्यांनी आतापर्यंत विश्वस्त म्हणून अनेक वर्षे काम केले आहे.त्यांना विश्वस्त म्हणून केलेल्या कामाचा मोठा अनुभव आहे.म्हणून त्यांची धर्मदाय आयुक्तांनी पुन्हा एकदा फेर निवड केली आहे.नव्याने निवड झालेल्या आकरा विश्वस्तात दोन “तानाजी” आहेत त्यामुळे ते निश्चितच कोंढाणा नव्हे “कान्होबा गड” सर करून आपल्या कार्याचा वेगळा असा ठसा उमटवून गडावर भगवा झेंडा फडकवतील अशी अपेक्षा आहे.धर्मदाय आयुक्तांनी नव्या निवडीचे पत्र दिलेले नवीन सन्माननिय विश्वस्त पुढील प्रमाणे आहेत.१) ॲडव्होकेट तानाजीराव धोंडीराम उर्फ रामचंद्र धसाळ पाटील ,२) तानाजीराव हिरामण शिंदे,३) अनिल अशोकराव साठे,४) सुरसिंगराव माधवराव पवार, ५) महादेव बबन कोकाटे,६) उत्तमराव शंकरराव मरकड,७)विठ्ठल राधाकिसन मरकड,८) दादासाहेब शिवराम मरकड,९) मदन विष्णू मरकड १०)सौ.माधुरी गणेश मरकड,११)सौ. उषा संतोष मरकड,या एकूण अकरा विश्वस्तावर अहिल्यानगर येथील धर्मदाय उप आयुक्त यांनी विश्वास टाकून त्यांच्या निवडीचे पत्र नूकतेच जाहीर केले आहेत.नवीन विश्वातांचे सर्व महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे.