झाडे जीवनाचा आधार कविता संग्रह पर्यावरण संवर्धनास दिशा देणार – नामदार गिरीष महाजन

झाडे जीवनाचा आधार कविता संग्रह पर्यावरण संवर्धनास दिशा देणार – नामदार गिरीष महाजन

 

 

 

जळगाव :- प्रकाश तेली यांच्या झाडे जीवनाचा आधार कविता संग्रह पर्यावरण संवर्धनास दिशा देणारा आहे असे प्रतिपादन नामदार गिरीष महाजन यांनी प्रकाश तेली यांच्या झाडे जीवनाचा आधार कविता संग्रह प्रकाशनाप्रसंगी मुंबई येथे काढले. प्रकाश तेली यांचे आतापर्यंत पंधरा हिंदी कविता संग्रह हे प्रकाशित झालेले असून झाडे जीवनाचा आधार हा सोळावा मराठी कविता संग्रह आहे.

 

प्रकाश तेली यांच्या लिखानावरून त्यांना समाजाप्रती असलेली तळमळ दिसून येते. प्रकाश तेली हे अत्यंत अभिनव पद्धतीने सामजिक कार्य करीत असून त्यांच्या साहित्य कार्य हे प्रत्येकाच्या जीवनास स्पर्श करणारा आहे असेही त्यांनी सांगितले. प्रकाश रामदास तेली हे कवी, लेखक, गीतकार, व पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक विषयांवर 5000 पेक्षा जास्त सामाजिक व इतर कविता लिहिलेल्या असून 7000 पेक्षा जास्त घोषवाक्य देखील लिहिलेले आहेत तसेच प्रकाश तेली यांनी विविध विषयांवर गाणे देखील लिहिलेले असून त्यांच्या साहित्य कार्याची नोंद विविध रेकॉर्ड बुक्स मध्ये देखील झालेली आहे.

 

काय आहे संदेश देतो झाडे जीवनाचा आधार कविता संग्रह:- झाडे जीवनाचा आधार कविता संग्रहात झाडांचे महत्व, वृक्ष लागवाडीची आवश्यकता, झाडांची होणारी कत्तल आणि दुरूपयोग याचे अतिशय सुंदर व मार्मिक असे विश्लेषण प्रकाश तेली यांनी झाडे जीवनाचा आधार ह्या कविता संग्रहात केलेले आहे. त्यांनी समाजाला सामाजिक साक्षर करण्याचा अतिशय सुंदर व अभिनव प्रयोग हाती घेतला आहे.

 

प्रकाश तेली यांचे प्रकाशित झालेले 15 कविता संग्रह पुढीलप्रमाणे :- प्रकाश तेली यांनी यांचे आता पर्यंत 15 काव्य संग्रह प्रकाशित झालेले आहेत ते पुढील प्रमाणे 1) सड़क सुरक्षा 2) बाल-विवाह 3) बढ़ती जनसंख्या 4) किसान 5) वोट 6) नदी-भारत की जलधारा 7) वोट – 2 8) वोट-3 9) खाद्य सुरक्षा 10) वोट-4 11) पानी 12) मन की बात 13) बिजली संरक्षण 14) शिक्षा की महत्ता 15) पेड़ की महत्ता.