सत्तेची मस्ती असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदाराने शेतीसाठी विजेची समस्या मांडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुस्काटात मारली, आमदाराने माफी मागावी म्हणून शेतकऱ्यांनी संताप व निषेध व्यक्त करत कोल्हार-घोटी हा महामार्ग अडवला
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासींचा तालुका म्हणून ओळखला जाणाऱ्या अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी एका वाचनालयाच्या इमारतीचे भुमीपुजन होते. या निमित्ताने अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीचे अजीत पवार गटाचे आमदार डॉ किरण लहामटे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रम संपल्यानंतर गावातील एक शेतकरी वाळिंबा होलगीर या शेतकऱ्यांने या आमदार महोदया कडे शेतीसाठी विजेच्या संदर्भात समस्या मांडली होती.या गोष्टीचा राग अनावर झाल्याने अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीचे अजीत पवार गटाचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी या गरीब शेतकऱ्यांच्या मुस्काटात मारली.यावेळी तेथे उपस्थित असलेले ग्रामस्थ देवराम फापाळे यांनी आमदार साहेब तुम्ही जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहात हे असे कृत्य करणे योग्य नाही.हे तुमच्या प्रतिष्ठेला शोभत नाही असे म्हणताच या आमदार महाशयांनी स्वतः च्या गाडीत बसून गावातून पळ काढला.झालेल्या प्रकारा बद्दल या अंन्याय ग्रस्त शेतकऱ्यांला काही पैसे देऊन हे प्रकरण जास्त गाजावाजा न करता जागेवरच मिटवण्याचा आमदारांनी केविलवाणा प्रयत्न केला होता.लिंगदेव ग्रामस्थ आणि कानडी समाजाच्या नागरीकांनी सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी एकत्र येऊन या आमदारांच्या मारहाणीचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त केला होता.यावेळी संतप्त झालेले एक शेतकरी जालींदर कानवडे म्हणाले की आम्ही पन्नास हजार रुपये रोख देतो आणि पाच वेळा या आमदाराच्या तोंडात मारतो चालेल का?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला होता.सरपंच अमित घोलप, देवराम फापाळे, कानडी समाज संघटनेचे बबनराव सदगीर,शंकरराव चोखंडे, बाळासाहेब कानवडे,अशोक कोरडे,संदिप शेणकर,या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दांत व्यक्त केल्या.या आदिवासी तालुक्यात रात्री बीबट्या वाघांची दहशत आणि दिवसा या मस्तावलेल्या आमदाराची दहशत अशा कडक शब्दांत संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.या पुर्वी ही या मस्तवाल आमदाराने एका शेतकऱ्याच्या पोटात लाथ मारली होती.तर दुसऱ्या शेतकऱ्यांचे तोंड फोडले होते असे एका व्यक्तीने सांगितले.तुमची अशी दहशत असेल आणि तुमच्या कडून सामान्य लोकांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर आम्हाला तुमच्या विकास नको आहे.अशा परखड शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.या बैठकीच्या वेळी या मस्तवाल आमदाराने अंन्याय ग्रस्त शेतकऱ्याची माफी मागितलीच पाहिजे अशी कडक भूमिका बाळासाहेब होलगर यांच्या कडून मांडण्यात आली होती. तसेच त्यांनी जर या आमदाराने माफी मागितली नाही तर कोल्हार-घोटी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही दिला होता.या पुर्वी अनेक आमदार या तालुक्यात होउन गेले पण त्यांनी कधीही जनतेचा असा उच्छाद मांडला नव्हता. या अकोले तालुक्याला माजी आमदार कै.यशवंतराव भांगरे,कै.बी.के. देशमुख,कै. मधुकर पिचड यांची महान परंपरा आहे. त्यांनी सत्तेवर असताना कधीही शेतकऱ्यांवर हात टाकला नाही.मात्र सन १९१९ या सालापासून सत्तेवर बसलेल्या या विद्यमान आमदारांने शेतकऱ्यांना धोपटायला सुरूवात केली आहे.मस्तवाल आमदाराने या अंन्याय ग्रस्त शेतकऱ्याची माफी मागितली नाही म्हणून आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी संतप्त शेतकऱ्यांनी कोल्हार-घोटी या मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.या आंदोलनात भारतीय जनता पार्टी,आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मार्गावर तीन किलोमीटर अंतरा पर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या आमदार महाशयांना धोबीपछाड देण्यासाठी आता पासूनच सर्व पक्षाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.बाजीराव दराडे आणि पुरोगामी नेते पोपटराव चौधरी यांनीही आपले विचार व्यक्त केले. आमदार असलेल्या व्यक्तीने असं गैरकृत्य करावं ही अकोले तालुक्याच्या द्रृष्टीने अतिशय लांच्छनास्पद बाब आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवण्याचे सोडून रास्त न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण करून आमदार लहामटे यांनी आपली स्वतःची आणि पक्षिय प्रतिमा मलिन करुन घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर शहरातील आमदारा प्रमाणे या आमदारालाही नोटीस देऊन चांगली समज द्यावी अशी सर्वच कार्यकर्त्यांनी यावेळी मागणी केली आहे.आमदार लहामटे हे स्वतः ला तालुक्याचे शहेनशहा समजत आहेत त्यांना निश्चितच त्यांची जागा आगामी निवडणुकीत दाखवून दिली जाईल असे मत या आंदोलनात मांडले गेले होते. आमदार साहेब नेमके कशाप्रकारे हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

























