Home महाराष्ट्र अगोदर अपहरण, नंतर खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

अगोदर अपहरण, नंतर खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

अगोदर अपहरण, नंतर खंडणी वसूल करणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

 

(सुनिल नजन “चिफ ब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अगोदर अपहरण करायचे आणि सोडवण्यासाठी खंडणीची मागणी करायची या बाबतीत तरबेज असलेल्या गुन्हेगारांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.या बाबतची माहिती अशी की,दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी श्री.बापुसाहेब रामदास गागरे,वय – 39 वर्षे रा.तांभोरे ता. राहुरी जि.अहिल्यानगर हे दिनांक त्यांच्या राहत्या घरातुन ड्रायव्हरला घेण्यासाठी वाकडी ता.राहाता येथे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या एका पांढ-या रंगाच्या चारचाकी वाहनाने पाठलाग करुन निळवंडे कॅनलच्या जवळ अडवले.फिर्यादीस हत्याराचा धाक धाकवुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन बळजबरीने गाडीमध्ये बसवुन घेवुन जावुन एका निर्जन ठिकाणी असलेल्या गोडाऊनमध्ये नेले.फिर्यादीस जोरदार मारहाण करुन दहा लाख रुपयांची खंडणी मागितली.तेव्हा मी मारहाण करणाऱ्यांना पैसे देतो असे सांगितले असता त्यांनी फिर्यादीच्या डोळ्याला पट्टी बांधुन आरोपीकडील चारचाकी वाहनात बसवुन फिर्यादीस शनिशिंगणापुर फाट्याजवळ आणून सोडुन दिले.व नंतर आरोपींनी फिर्यादीस फोन करुन खंडणीचे पैसे कधी देणार आहे ते सांग. तू जर आम्हाला पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारुन टाकु अशी धमकी दिली आहे.याबाबत राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1163/2025 भारतीय न्याय संहितेचे 2023 चे कलम 140(2), 308(3)(4)(5), 115(2), 351(2), 352, 3(5) प्रमाणे अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हा घडल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, रमिजराजा आत्तार, प्रशांत राठोड,विशाल तनपुरे,महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत, चालक अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी सुचना देत मार्गदर्शन करुन रवाना केले. दिनांक 17/11/2025 रोजी वरील पथकास तांत्रिक विश्लेषण व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा संशयीत इसम नामे ओम अशोक ठोंबरे व अजय शंकर हुलावळे यांनी त्यांच्या साथीदारासह केला असुन ते कोथरुड पुणे येथे वास्तव्य करीत आहेत.सदर पथकाने तात्काळ पुण्यातील कोथरुड येथे जावुन आरोपींचा शोध घेतला असता ते तेथेच मिळुन आल्याने त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांव 1) ओम अशोक ठोंबरे,(वय 20 वर्षे), हल्ली राहणार सुतारदरा,ता. हवेली, जि.पुणे, मुळ राहणार देवगाव, ता. नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, 2) अजय शंकर हुलावळे,(वय 21 वर्षे), राहणार सुतारदरा, ता. हवेली, जि.पुणे, 3) सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे, (वय 19 वर्षे),राहणार तांभेरे, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, 4) साई परमेश्वर ढवळे, (वय 18 वर्षे), राहणार भेंडा, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी करता अजय शंकर हुलावळे याने सदरचा गुन्हा 5) रामेश्वर उर्फ राया, जि.पुणे,(फरार) 6) रोहित रुईकर राहणार भेंडा, ता. नेवासा, जिल्हा अहिल्यानगर (फरार) यांचेसह अपहरण करुन खंडणी मागणी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या सांगण्या वरुन 1 लाख

19 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या

ताब्यातील आरोपी नामे 1) ओम अशोक ठोंबरे, (वय 20 वर्षे), हल्ली राहणार, सुतारदरा, ता. हवेली, जि.पुणे, मुळ राहणार. देवगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, 2) अजय शंकर हुलावळे, (वय 21 वर्षे), राहणार. सुतारदरा, ता. हवेली, जिल्हा.पुणे, 3) सोन्या उर्फ आदित्य रावसाहेब गागरे,(वय 19 वर्षे), राहणार. तांभेरे, ता. राहुरी, जिल्हा. अहिल्यानगर, 4) साई परमेश्वर ढवळे,(वय 18 वर्षे), राहणार. भेंडा, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर यांना राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 1163/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140(2), 308(3)(4)(5), 115(2), 351(2), 352, 3(5) या गुन्ह्याच्या तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे साहेब, यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. या टोळीने जिल्हाभर धुडगूस घालत अजूनही अनेक ठिकाणी गुन्हे केले आहेत की काय याचा ही तपास पोलीस करीत आहेत.

Don`t copy text!