तालुकास्तरीय व्हॉलीबॉलचे ही विजेतेपद गुरुकुल च्या नावावर
पाचोरा प्रतिनिधी-
:-२८/०८/२०२५ रोजी पाचोरा येथे आयोजित तालुकास्तरीय 17 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थिनींनी जबरदस्त कामगिरी दाखवत सर्वांचे लक्ष वेधले.
पाचोरा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थिनींनी संघाचे शानदार खेळी करत तालुक्यातील इतर शाळेंच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले..
अंतिम सामना अतिशय चुरशीचा ठरला गुण संख्या (११-५ व ११-७) अशा सरळ दोन सेटमध्ये गुरुकुलच्या विद्यार्थिनींनी विजय मिळवून जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.
विजेत्या संघाच्या विद्यार्थिनीचे नाव-खुशी कुकरेजा, अर्पिता शामनानी,श्वेता पाटील,शायनी मनवाणी,निकिता रत्नानी,मानसी महाजन,पलक पंजवाणी,टीना रत्नाणी,गीत आहुजा ,कीर्ती आहुजा,किंजल वाधवानी,सुहाना पंजवानी असे आहे.
विजेत्या संघाचे शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनानी सर, शिक्षक वृंद व तालुकास्तरीय सामन्यासाठी हजर कोच यांनी कौतुक करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विजय संघाला क्रीडा शिक्षिका साक्षी पवार ,तसेच क्रीडा शिक्षक निरंजन राठोड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कॅरम ,बॅडमिंटन ,बुद्धिबळ व व्हॉलिबॉल अशा एकापाठोपाठ चार क्रीडास्पर्धेत गुरुकुल स्कूलला प्राप्त झालेल्या विजयामुळे गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडून नवीन आत्मविश्वास संचारला आहे.