श्री. गो.से. हायस्कूलला सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी उत्साहात  

श्री. गो.से. हायस्कूलला सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी उत्साहात

 

 

पाचोरा- तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित

श्री. गो. से. हायस्कूल येथे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व.इंदीरा गांधी यांची पुण्यतिथी शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस व एकता दोड रॅलीचा आरंभ एम एम महाविद्यालयात झाला तर समारोप श्री. गो.से. हायस्कूल येथे झाला. याप्रसंगी पि.टी.सी. संस्थेचे चेअरमन नानासो.

संजयजी ओंकार वाघ व स्कूल कमिटी चेअरमन दादासो. खलील दादामियां देशमुख यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले.खलील देशमुख यांनी आपल्या भाषणात महापुरुषांच्या कार्याचा गौरव तर नानासो संजयजी ओंकार वाघ यांनी एकतेचे महत्व प्रतिपादन करत थोर महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी आजच्या तरुणांसाठी आणि एकूणच समाजासाठी प्रेरणादायी स्त्रोत असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित जेष्ठ संचालक आप्पासो.सतिश चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधीर पाटील सर, एस एन पाटील सर, एम एम कॉलेजचे उपप्राचार्य वले सर, जे.व्ही. पाटील सर, एस एस पाटील सर,सर्व प्राध्यापक वृंद तसेच श्री. गो.से. हायस्कूलचे मुख्याध्यापक एन.आर. ठाकरे सर,उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील सर, पर्यवेक्षक सौ.गोहिल

मॅडम,आर.बी.बांठिया सर,आर. बी. तडवी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख महेश कौडिण्य सर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर भाऊसाहेब, सर्व शिक्षक वृंद, किमान कौशल्याचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले.

सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.उज्वल पाटील सर यांनी केले.