तुषार सोनवणे याची राज्य खो-खो प्रशिक्षणासाठी निवड

_तुषार सोनवणे याची राज्य खो-खो प्रशिक्षणासाठी निवड…!!!_

जळगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा शिबिरासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने श्री.गणपतराव पोळ,क्रीडा विकास प्रबोधिनीचा राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार हिरामण सोनवणे याची निवड करण्यात आली आहे,सदर शिबीर जिल्हा क्रीडा संकुल,मिरज रोड,सांगली येथे दि.५ मे ते १९ मे २०२३ दरम्यान पार पडणार आहे,या शिबिरात तुषारला तज्ञ प्रशिक्षक,आहार तज्ञ,फिजिओथेरेपिस्ट आदिंचे मार्गदर्शन लाभणार आहे,तुषार यांस प्रबोधिनीचे प्रशिक्षक राहुल पोळ,विशाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
तुषारच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,भारतीय खो-खो महासंघाचे प्रा.डॉ.चंद्रजीत जाधव,सचिव गोविंद शर्मा,मा.आ.चंद्रकांत सोनवणे,प्रा.डी.डी.बच्छाव,दत्तुदादा चौधरी,ग.स.सो.अध्यक्ष उदय पाटील,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतराव पोळ,जयांशु पोळ,सुनिल समदाणे,प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर,विद्या कलंत्री,एन.डी.सोनवणे आदि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.