राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सोयगावात – पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ आणि वृक्षारोपण सोहळा उत्साहात

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश सोयगावात – पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ आणि वृक्षारोपण सोहळा उत्साहात

 

 

दत्तात्रय काटोले सोयगाव (प्रतिनिधी):

महान स्वातंत्र्यसैनिक आणि भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिन सोयगावात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सोयगाव पोलीस स्टेशनतर्फे “रन फॉर युनिटी – 2 किमी मॅरेथॉन स्पर्धा” आणि वृक्षारोपण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले.

सकाळी 7.30 वाजता सुरू झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी, अकरा अंमलदार तसेच शहर आणि परिसरातील 60 ते 70 प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेचा समारोप सकाळी 7.40 वाजता झाला. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यानंतर पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपण सोहळा पार पडला. या प्रसंगी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले. नगरसेवक बंटीभाऊ काळे, राजुभाऊ दुतोंडे, विजयभाऊ काळे, विजय चौधरी, अरुणभाऊ सोहणी, संतोष सोहणी, ईश्वर इंगळे, दत्तात्रय काटोले,पोलीस पाटील तसेच पोलीस कर्मचारी दाडगे साहेब, सागर कोळी, तडवी साहेब, व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक पंकज बारवाल साहेब म्हणाले, “राष्ट्रीय एकात्मता म्हणजे फक्त एकतेचा संकल्प नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन राष्ट्रनिर्मितीचे कार्य करणे हीच खरी श्रद्धांजली आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक युवक संघटनांनी मोठे सहकार्य केले.

या उपक्रमामुळे एकता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश सोयगाव शहरात प्रभावीपणे पोहोचला.