पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघ बचाव कृती समितीची आज पाचोरा येथे बैठक संपन्न झाली

पाचोरा तालुका शेतकरी सहकारी संघ बचाव कृती समितीची आज पाचोरा येथे लक्ष्मी प्लाझा च्या जागेत बैठक संपन्न झाली

पाचोरा ( प्रतिनिधी )
सदर बैठकीमध्ये शेतकी सहकारी संघ या एकेकाळी जागतिक दर्जा मिळालेल्या सहकारी संस्थेची झालेली वाताहत आणि बेकायदेशीर होत असलेली जमीन मिळकत विक्री या सगळ्यांबाबत चर्चा करण्यात आली. शेतकरी सहकारी संघाला गत वैभव प्राप्त करून देणे आणि झालेल्या विक्री व्यवहारांना बेकायदेशीर ठरवून कायदेशीर लढा देणे तसेच त्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अशी भूमिका सर्व सदस्यांनी बैठकीत व्यक्त केली.
शेतकरी संघाची जागा ही मूळ मालकांच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर परस्पर हस्तांतरित होत असल्याबद्दलचा कायदेशीर लढा सुरू करणे. शेतकी संघाने सिटीझन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर ग्रुप यांना खरेदी करून दिलेला नेमका व्यवहार कशाचा आहे याची माहिती घेणे त्या संदर्भात न्यायालयीन दावे दाखल करणे शेतकी संघाच्या परिसरात राहणारे व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्या हितसंबंधांसाठी योग्य तो न्यायालयीन लढा उभा करणे. सदर शेतकी संघाची आजच्या काळात नेमकी बाजार मूल्य किती आहेत त्याची माहिती घेणे व त्या दृष्टीने व्यवहार झालेले आहेत का नाही हे जनतेसमोर आणणे. जनतेच्या संमतीशिवाय लोकांना अंधारात ठेवून जे काही शेतकी संघाची विक्री आणि व्यवहार सुरू आहेत त्याची सर्व माहिती जनतेमध्ये पसरवणे आणि लोकांना या सहकारी संस्थेला वाचवण्यासाठी आवाहन करणे या सर्व गोष्टींसाठी योग्य ती कायदेशीर मदत घेणे लोकांच्या सहभागाने सार्वजनिक रास्ता रोको धरणे उपोषणे यासारख्या मार्गांचा अवलंब करून लोकजागृती करून हा विषय तडीस नेणे इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली.
सभेमध्ये अँड अण्णा भोईटे अँड योगेश पाटील नितीन पाटील प्रवीण पाटील हरिभाऊ पाटील पप्पू राजपूत अँड अविनाश भालेराव यांनी आपापली मते व्यक्त केली.
लवकरच याबाबत सर्व लोकप्रतिनिधींना अवगत करून ही संस्था वाचवण्यासाठी आवाहन करण्याचे तसेच मोठ्या स्वरूपामध्ये जन आंदोलन उभे करण्याचे या वेळेला ठरवण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक अँड अभय पाटील यांनी केले तर आभार किशोर डोंगरे यांनी मानले
बैठकीसाठी अँड अण्णासाहेब भोईटे अँड योगेश जगन्नाथ पाटील अँड अभय पाटील नितीन पाटील प्रवीण पाटील दीपक मुळे संतोष पाटील फिइम शेख प्रकाश सुतार शरद पाटील हरिभाऊ पाटील अँड अविनाश भालेराव पप्पू राजपूत भरत खंडेलवाल राजू अहिरे भूषण अमृतकर दिलीप जैन किशोर डोंगरे सुनील पाटील आनंद सांगवी नंदकुमार सोनार अँड दीपक पाटील तसेच पाचोरा तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते हजर होते.