ईद-ए-मिलाद प्रेम, बंधुत्व,समता चा संदेश देणारा सण आहे.आमदार किशोर आप्पा पाटील
ईद-ए-मिलादुन्नबी हे प्रेम बंधुत्व व समताच्या संदेश देणारा सण आहे असे प्रतिपादन भडगाव येथे एका ईद-ए-मिलादुन्नबी सत्कार समारंभ मध्ये आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. इतर ठिकाणाप्रमाणे भडगाव येथेही 1500 वा जशने ईद मिलादुन्नबी उत्साहाने साजरा करण्यात आला. दुपारी तीन वाजता, टोणगांव, यशवंत नगर, जलाली मोहल्ला, ग्रीन पार्क, कडून जुलूसची सुरुवात झाली. लोकांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर दरुदो सलाम पठण करून मिरवणूक काढली. जुलूस मध्ये लहान मुलापासून,तरुण, वयोवृद्ध, सर्व प्रकारचे लोक,उत्साहाने हजर होते. मोहम्मद पैगंबर यांच्या 1500 वा मिलाद असल्याने वेगळ्या पद्धतीने व उत्साहाने ईद मिलादुन्नबी साजरा करण्यात आली.मुस्लिम बांधवांना मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, सामाजिक कार्यकर्ते, शहरातील प्रसिद्ध राजकीय लोक मिरवणूक जागी पोहोचले. टोनगाव मशीद कडे मिरवणुकीच्या सुरुवातीलाच सत्कार समारंभाच्या आयोजन करण्यात आलेला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तालुक्याचे आमदार माननीय किशोर आप्पा पाटील साहेब हे होते. मुख्य अतिथी म्हणून, गरीब नवाज फाउंडेशन चे उपाध्यक्ष शेख जावेद रहीम, जॅकी खाटीक,आसीम मिर्जा हे होते. आमदार साहेबांच्या हस्ते इमाम अहमद रजा व मोहम्मदया नगर फळाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी शेख जावेद रहीम व आसिम मिरजा यांनी मिलादुन्नबी साजरा करण्यामागे उद्दिष्ट काय? मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या जीवनात मानवतासाठी, केलेला काम,प्रेम,बंधुत्व, एकताच्या बद्दल दिलेला संदेश याबाबत माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात किशोर आप्पा पाटील यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलादुन्नबीची शुभेच्छा दिली. त्यांनी सांगितले ईद मिलादुन्नबी हे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिन असून प्रेम,बंधुत्व, समता, एकता च्या संदेश देणारा सण आहे. कार्यक्रम मध्ये सहभागी झाल्याने आनंद होत आहे.सर्व धर्मातील लोकांनी,एकमेकांशी संपर्क साधावा,एकमेकांचे सन साजरा मध्ये हजेरी लावावी, जातीय सलोखा कायम ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार आसीम मिर्जा यांनी केले. जुलूस मध्ये उपस्थित बांधवांनी एकमेकांशी गले मिळून शुभेच्छा दिली. सदर कार्यक्रम मध्ये माजी नगराध्यक्ष राजेंद्र महादू ,प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले ,नगरसेवक संतोष महाजन, जग्गू भोई,महेंद्र ततार, नथू अहिरे, युवा तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ,इलियास मिरजा,अरशद मिरजा, मोठी संख्या मध्ये हिंदू मुस्लिम समाजाचे लोक उपस्थित होते.