MH-AAC-CET परीक्षेत रंगश्री ची गगन भरारी

MH-AAC-CET परीक्षेत रंगश्री ची गगन भरारी

 

एम.एच- ए.ए सी., या शासनाची चित्रकलेची CET परीक्षा दर वर्षी घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रातील गव्हर्नमेंट जसे जे. जे. स्कुल ऑफ आर्ट मुंबई, औरंगाबाद, नागपूर व इतर नामांकित कलेच्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळत असते. जेणे करून ते आपल्या आवडत्या विषयात करियर करू शकतात. कलेचे क्षेत्र हे अथांग सागर आहे.

या वर्षी ही रंगश्री आर्ट फाऊंडेशन चे 6 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहे.

कु.प्रांजल प्रेमदास पवार हिला कलेचे माहेर घर असलेले गव्हर्नमेंट सर जे. जे, इन्स्टिटयूट ऑफ अप्लाईड आर्ट, मुंबई येथे प्रवेश मिळाला आहे   आतापर्यंत रंगश्री चे जवळपास15 विद्यार्थांनी जे जे, मुंबई येथे प्रवेश मिळवीला आहे.

स्वयम भाऊसाहेब सुतार -अप्लाईड आर्ट,कु. वैष्णवी देवेंद्र दातीर-पेंटिंग,जयदीप रवींद्र पाटील-पेंटिंग यांना गव्हर्नमेंट स्कुल ऑफ आर्ट छ. संभाजी नगर येथे प्रवेश मिळाला आणि कु.दिशा राजेंद्र महाजन,कु.सिद्धी ज्ञानेश्वर सुतार यांना विवा इन्स्टिटयूट ऑफ आर्ट विरार,येथेअप्लाईड आर्टसाठी प्रवेश मिळाला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या

पाचोरा परिसरात विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. श्री. गो से. हायस्कुल चे सुबोध कांतायन सरांनी त्यांना कलेचे ज्ञान दिले आहे या प्रसंगी उत्तीर्ण विदयार्थ्यांचा उत्साह वाढण्यासाठी कलेच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी तयारी करत असलेले रंगश्री चे विद्यार्थी उपस्थित होते.