पाचोरा पोलीस निरीक्षक याच्यां दालनात बकरी ईद सणानिमीत्त मीटिंग संपन्न

पाचोरा पोलीस निरीक्षक याच्यां दालनात बकरी ईद सणानिमीत्त मीटिंग संपन्न या वेळी वेब मिडीया चे शेख जावेद उपस्थिती होते

पाचोरा (प्रतिनिधी शेख जावीद) बकरी ईद सणानिमीत्त पोलीस निरीक्षक सो: नजन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार मिटिग घेण्यात आली! शासन आदेशानुसार स्तर 3 चे निर्बधं लागू आहे! त्यानुसार कोविड 19 कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव अनुषगाने सण उत्सव मस्जिद अथवा ईदगाह तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरीच अदा करावे असे सूचना करण्यात आली.करोनाच्या डेल्टा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक,धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद उत्सव साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सामूदायिक नमाज पठणाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.मुस्लिम बांधवांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करीत घरीच नमाज पठन करावे,असे पाचोरा पो स्टे येथे मिटिंग मध्ये योग्य सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळेला उपस्थित पोलीस स्टॉप सुनील पाटील किशोर पाटील राहुल बेहरे किशोर पाटील,नितीन पाटील, पत्रकार शेख जावीद मुस्लिम बांधव आधी उपस्थित होते.