पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे शनिवारी भव्य कृषी परिसंवाद मेळावा उपस्थितीचे आवाहन

पाचोरा-भडगांव बाजार समितीतर्फे शनिवारी भव्य कृषी परिसंवाद मेळावा उपस्थितीचे आवाहन

पाचोरा(वार्ताहर) दि,२८
पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या शेती विषयक विविध समस्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी शनिवार दि. ३० रोजी भव्य कृषी मेळावा व परिसंवादा चे आयोजन पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सकाळी १० वाजता आयोजित
करण्यात आले आहे. या कृषी परिसंवाद मेळाव्याचे अध्यक्षस्थानी पाचोरा भडगाव मतदार संघाचर आमदार किशोरआप्पा पाटील हे असून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दिलीपभाऊ वाघ हे करणार आहेत. यावेळी तालुक्यातील कृषी तज्ञ व या कृषी मेळाव्याला आत्माचे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे हे ‘कृषी उद्योजक एक काळाची गरज’ याविषयावर मार्गदर्शन करणारा आहेत. तसेच ‘कृषी विभागाच्या विविध योजना’ यासंदर्भात नाशिक येथीलअश्वमेध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कैलास मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळवा व परिसंवादासाठी परिसरातील व पाचोरा व भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव सरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संचालकांनी तथा दूध संघाचे सर्व संचालक बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील व उपसभापती पी. ए.पाटील व संचालक मंडळाने यांनी केले असून कार्यक्रमांनंतर स्नेहभोजणाची व्यवस्था केली असल्याचे कळवले आहे.