मेरी माटी मेरा देश चा नारा बुलंद 21 महिला सायकलस्वार गुहाटी ते मुबंई दरम्यान प्रवास आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार स्वागत

मेरी माटी मेरा देश चा नारा बुलंद 21 महिला सायकलस्वार गुहाटी ते मुबंई दरम्यान प्रवास आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते होणार स्वागत

 

पाचोरा(वार्ताहर) दि,९
‘मेरी माटी मेरा देश’ चा नारा बुलंद करून देशातील वेगवेगळ्या राज्यातील जनतेला परस्परांशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने घाटकोपर (मुंबई) येथील श्रीमती पी एन दोषी महिला महाविद्यालयाच्या २१ महिला सायकलस्वारांनी आसाम राज्यातील गुवाहटी ते मुंबई दरम्यान सुरू केलेली सायकल यात्रा १० रोजी पाचोरा मुक्कामी येत असून याअंतर्गत २७५१ किलोमीटरचा प्रवास हे सायकलस्वार करणार आहेत.या सायकल प्रवासाचे मुख्य प्रवर्तक महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय पाटील हे असून ते पाचोरा महाविद्यालयाचे विद्यार्थी व क्रीडापटू देखील आहेत. या सायकल स्वारीतून ते २६ दिवसात एकूण ६ राज्ये पादाक्रांत करणारा आहेत.
दरम्यान त्यांची सायकल स्वारी शनिवारी पाचोऱ्यात दुपारी ४ वाजता पोहचणार असून शहरातील सारोळा रोड स्थित समर्थ लॉन्स येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार असून पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी त्यांचे निवासासह भोजनाची व्यवस्था केली आहे. ते रविवारी सकाळी ५ वाजता पुढील प्रवासाला निघणार आहेत.