भडगाव पं.स.गटविकास अधिकारी श्री वाघ साहेब यांचा सत्कार व हितगुज श्री अनिल सावंत सर

भडगाव पं.स.गटविकास अधिकारी श्री वाघ साहेब यांचा सत्कार व हितगुज श्री अनिल सावंत सर

नुकतेच काही दिवसांपूर्वी आलेले भडगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीयुत रमेश वाघ साहेब यांचा सत्कार गाळण बु सरपंच श्रीयुत राजेंद्र सावंत व सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीयुत अनिल भाऊ सावंत सर यांच्या हस्ते भडगाव पंचायत समिती कार्यालयात करण्यात आला यावेळी सामाजिक विषयावर हितगुज व सखोल चर्चा झाली तसेच विविध विकासकामे योजनेचा संपूर्ण तपशीलवार माहितीचे मार्गदर्शन श्रीयुत गटविकास अधिकारी वाघ साहेब यांनी दिले तसेच समाज, व विकास यासंदर्भात कधीही सहकार्य करण्याची भूमिका माझी राहील असेही याप्रसंगी आदरणीय श्रीयुत वाघ साहेब यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नूतन सरपंच श्रीयुत राजेंद्र सावंत यांच्या कामाचे देखील त्यांनी कौतुक करून असेच समाजाचे नाव उज्ज्वल करावे असेही याप्रसंगी काढले त्याचप्रमाणे श्रीयुत अनिलभाऊ सावंत सर यांच्यावर जे कोरोना काळात दुःख कोसळले त्यात मी सहभागी होतोच परंतु त्यांच्यावर एवढे मोठे संकट येऊन ते पुन्हा जोमाने सामाजिक तसेच इतर क्षेत्रात कामाला लागले त्याबद्दल देखील त्यांनी श्रीयुत अनिलभाऊ सावंत सर यांचे कौतुक केले शेवटी श्रीयुत अनिलभाऊ सावंत सर श्रीयुत राजेंद्र सावंत यांनी आभार व्यक्त केले