येत्या २६ डिसेंबर दत्त जन्मोत्सव निमित्ताने पाचोरा तालुक्यातील ( देवाची ) कुरंगी नगरीत लागणार ” मेला ” (जत्रा) यात्रोत्सव

येत्या २६ डिसेंबर दत्त जन्मोत्सव निमित्ताने पाचोरा तालुक्यातील ( देवाची ) कुरंगी नगरीत लागणार ” मेला ” (जत्रा) /यात्रोत्सव

येत्या देव दिपावली शुभ मुहुर्तावर 13 डिसेंबर 2023 पासुन यात्रेला सुरूवात – 30 डिसेंबर पर्यंत राहणार

जळगाव जिल्ह्यातील व पाचोरा तालुक्यातील आणि परीसरातील लहान -मोठे व्यावसायिक, विक्रेते, पाळणे सह मनोरंजन करणारे संचालक यांनी यात्रेत दुकाने लावण्याचे नागरीकांद्वारे नम्र आवाहान

दर्शनासाठी आणि सर्व धार्मिक कार्यक्रमांना भावीकभक्त व नागरिकांनी उपस्थिती द्यावी आणि इच्छापुर्तीसाठी नवस मानावेत

*दि.५/१२/२०२३ मंगळवार:* पाचोरा तालुक्यातील (देवाची) कुरंगी नगरीत यंदा या वर्षापासुन यात्रा भरवण्याचा निर्णय गावातील नागरीकांनी सर्वानुमते घेतला असुन कारण भारतातील व महाराष्ट्र राज्यातील अव्वल आणि सर्वात मोठी ५५० किलो वजनाची भगवंत श्री गुरूदेव दत्त महाराज यांची पंचधातु मुर्ती’ची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा हा श्री समर्थ सद्गुरु बालयोगी श्री सिध्देश्वर सिंग महाराज यांच्या शुभहस्ते २१ डिसेंबर २०२३ यंदा संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने १७ डिसेंबर ते ३० डिसेंबर मोठे कार्यक्रम त्यात ११ ब्रम्हवृंद यांच्या मंत्रोच्चारात तीन दिवसात ग्रह देवताचे पिठ स्थापना,अग्नी स्थापना, धान्यदीवास, जलादीवास, निद्रादीवास, प्राणप्रतिष्ठा व स्थापना विधीवत पुजा सिध्दपिठावर होईल.११ दिवसीय अखंड हरीनाम यज्ञ, संगितमय रामायण सुंदरकांड पाठ, दररोज पहाटे काकडा भजन, आरती, हरीपाठ, भजनसंध्या, वह्या, भारूड चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. २८ डिसेंबर रोजी गुरूपुष्यामृतयोग चे शुभमुहूर्त साधुन अखंड हरीनाम किर्तन यज्ञाचे काल्याचे किर्तन सकाळी- ९-१२ संपन्न होणारे येणारे सर्व भावीक भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.

श्री गुरूदेव दत्त महाराज मंदिराचे ( नवनाथ दरबार ) सिध्दपिठाचे भव्य निर्मितीचे काम वर्षभरापासुन मठाधिपती: श्री समर्थ सद्गुरु बालयोगी श्री सिध्देश्वर सिंग महाराज यांनी सुरू केलेले असुन पुर्ण कामासाठी अजुन एक वर्ष लागणार आहे.

मंदिराची विशेषत: म्हणजे भावीकांना साक्षात साक्षात्कार या दिव्य मंदिरात आल्यानंतर मिळणार आहे. केलेल्या मनोकामना व इच्छा आणि मानलेल्या नवसांना येथे पुर्णावती मिळणार आहे. भविष्यात या मंदिराची व देवस्थानाची ख्याती व प्रसिद्धी जलदगतीने होऊन देवाची कुरंगी हे गाव महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख तीर्थक्षैत्रात गणले जाणार आहे.आज सुरूवात झाली असुन लवकरच याचे वटवृक्षात रूपांतरण होणार आहे. हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे मंदिर असणार आहे.

यंदापासुन या यात्रा उत्सव ला सुरूवात होणार असुन परीसरातील व जिल्ह्यातील भावीक भक्तांनी दर्शनासाठी तर लहान मोठे व्यावसायिकांनी, दुकानदारांनी, पाळणे सह मनोरंजन संचालक यांनी मोठ्या संख्येने पाचोरा तालुक्यातील देवाची कुरंगी या नगरीत येऊन उपस्थिती द्यावी व हा यात्रोत्सव संपन्नतेसाठी हातभार लावुन आम्हास उपकृत करावे आणि भावीकांसाठी नवस करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.असे नम्र आवाहान देवाची कुरंगी येथील नागरीकांनी जाहिर प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे. यात्रेनिमित्ताने किंवा कार्यक्रम बद्दल काही माहिती व मदत लागल्यास सरपंच पती नगराज पाटील ८७६६८८६०२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.