पि.टी.सी.शिक्षण संस्था आयोजित शिक्षक क्रिकेट चषक 2024 चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

पि.टी.सी.शिक्षण संस्था आयोजित शिक्षक क्रिकेट चषक 2024 चा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था आयोजित शिक्षक क्रिकेट चषक 2024 चा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चषकाचे मानकरी ठरलेल्या ‘गुरु 11’ नगरदेवळा संघाला पाचोरा-भडगाव मतदार संघाचे मा.आमदार व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ व संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते ट्रॉफी व 11111/- रुपये देऊन गौरविण्यात आले. तसेच उपविजेत्या किसान स्पोर्ट्स क्लब भडगाव या संघाला सतीश चौधरी यांच्या हस्ते ट्रॉफी व 7777/- रुपये देऊन गौरविण्यात आले. सर्व सामन्यातील सामनावीर,सहभागी संघांना व प्रायोजकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास माजी आमदार तथा अध्यक्ष पा.ता.सह.शिक्षण संस्था दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी.जोशी ,ज्येष्ठ संचालक सुभाष तोतला, दगाजीराव वाघ, सतीश चौधरी, वासुदेव महाजन,बापूसाहेब सोनार,ग.स. संचालक अजय सोमवंशी,भडगाव न.प.चे मा.नगराध्यक्ष श्याम दादा भोसले,.शशिकांत चंदिले,.विश्वासराव साळुंखे,शशिकांत महालपुरे,ज.जि.मा.पतपेढीचे मानद सचिव .जगदीश पाटील,माध्यमिक पतपेढीचे संचालक .भावेश अहिरराव,.विपीन पाटील, राकेश पाटील,.एस. एम.पाटील,अभिजीत पाटील,.सी.एन. चौधरी सर,.शांताराम चौधरी सर, शिरीष पाटील सर,डॉ.अमोल जाधव,डॉ.नरेश गवंदे, श्री.राजू दादा पाटील हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दीपक पाटील सर यांनी तर आभार श्री.योगेश वाणी सर यांनी मानले.चषकाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री प्रा.गिरीश पाटील,आशिष पाटील,स्वप्निल माने,वीरेंद्र पाटील, मनोज पवार व इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.