कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगावच्या सयाजी मदनेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड…!!!!!
कोळगाव (भडगाव) -कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत “कला व विज्ञान महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव” येथील सयाजी बापू मदने (एफ.वाय.बी.ए.), याने चंदीगड विद्यापीठ,मोहाली (पंजाब)येथे आयोजीत,पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत ७४ किलो फ्रीस्टाईल वजनी गटात यश मिळवले असून त्याची चंदीगड विद्यापीठ,मोहाली,(पंजाब) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सयाजी यास प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
सयाजीच्या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रतापराव पाटील,संस्थेच्या व्हा.चेअरमन तथा जिल्हा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,संस्थेचे सचिव प्रशांतराव पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,मुख्याध्यापक कमलेश शिंदे,प्र.प्राचार्य नरेंद्र भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.