३ राज्यातील विजयानंतर पाचोर्‍यात अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचा जल्लोष

३ राज्यातील विजयानंतर पाचोर्‍यात अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचा जल्लोष

पाचोरा-
देशात नुकत्याच ४ राज्यांच्या विधानसभेचे निवडणूक निकाल जाहीर झाले.यामध्ये भारतीय जनता पार्टीने ३ राज्यांमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापित करत मोठा विजय खेचून आणला आहे. यानिमित्त भारतीय जनता पार्टी पाचोर्‍याच्या वतीने विधानसभा निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात आज अटल भाजपा कार्यालय पाचोरा येथे मोठ्या प्रमाणात फटाके फोडून आणि घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी व अमितजी शहा,जे.पी.नड्डाजी यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला हा विजय मिळाला असून मोदीजींच्या दूरदृष्टी नेतृत्वावर विश्वास ठेवत जनतेने हा विजय आम्हाला मिळवून दिला तसेच होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीने महाविजय मिळवेल असा आत्मविश्वास अमोलभाऊ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.
याप्रसंगी बाजार समितीचे मा.सभापती सतीशबापू शिंदे,पंचायत समितीचे मा.सभापती बन्सीलाल पाटील,जिल्हा पदाधिकारी कांतीलाल जैन,शहराध्यक्ष दीपक माने,संजय पाटील,समाधान मुळे,शरद पाटील,सुनिल पाटील,मुन्नाशेठ अग्रवाल,किरण पांडे,जगदीश पाटील,योगेश ठाकूर,गौरव पाटील,पिंटू चौधरी,विशाल मोरे,राहुल गायकवाड,मनोज धाडीवाल,संदीप पाटील,विकास पवार,प्रदीप पाटील,रोहन मिश्रा,विशाल सोनवणे,राजू चव्हाण,संदीप पाटील,राहुल महाजन,विजय महाजन भावेश पाटील,योगेश लोणारी,अक्षय मंदाडे,आकाश मोरे.आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.