लाडकुबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा ऋषिकेश पाटील याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

लाडकुबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा ऋषिकेश पाटील याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड…!!!!

भडगाव (प्रतिनिधी) –

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,लाडकुबाई विद्यामंदिर व दादासो सुपडू मालजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय,भडगाव येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी तसेच किसान स्पोर्ट्स अकॕडमीचा खेळाडू ऋषिकेश बाबाजी पाटील याने मुलांच्या १९ वर्षाआतील ६२ किलो वजनी गटात,क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे,जिल्हा क्रीडा संकुल,नाशिक येथे आयोजीत नाशिक विभागीय शालेय कराटे स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले त्याची बारामती जि.पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ऋषिकेश यांस माजी विद्यापीठ खेळाडू तथा आदर्श क्रीडा शिक्षक प्रा.सतीश पाटील,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

ऋषिकेशच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील,सचिव डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालयीन उपसचिव प्रशांतराव पाटील, वैशाली शिंदे,उपप्राचार्य बी.जे.पाटील यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.