सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा आजपासून धाराशिवमध्ये

सुवर्ण महोत्सवी राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा आजपासून धाराशिवमध्ये

 

राज्यातील २४ कुमार व २४ मुलींचे संघ भाग घेणार.

 

*राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ कुमार व मुलींचे संघ निवडणार*

 

धाराशिव, दि. २६ ऑक्टोबर-

 

सुवर्ण महोत्सवी ५० वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा रविवारपासून (दि. २७)धाराशिवमध्ये सूरू होत आहे.

 

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा ३० ऑक्टोबरपर्यंत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर होईल. यासाठी ३ मैदाने तयार करण्यात आली असून ही स्पर्धा सकाळ व सायंकाळ आणि रात्री विद्युतझोतातही होणार आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरी तयार करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांची निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

या स्पर्धेत राज्यातील २४ कुमार व २४ मुलींचे संघ भाग घेणार आहेत. या स्पर्धेतून प्रशांत कदम (सातारा) रमेश नांदेडकर (नांदेड), संदीप चव्हाण (पुणे) व भावना पडवेकर (ठाणे) हे निवड समिती सदस्य महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ निवडणार आहेत. हे संघ २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत भाग घेणार आहेत

 

या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. २७) सायंकाळी ५.३० वाजता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते व लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आव्हान महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव आणि उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनचे अध्यक्ष अनिल खोचरे व सरचिटणीस प्रवीण बागल यांनी कळविले आहे.

——–

ही स्पर्धा साखळी बाद पद्धतीने होणार आहे. सलामीच्या दिवशी होणारे सामने साखळीतील सामने या याप्रमाणे होणार आहेत.

 

*सकाळ सत्र :*

कुमार : सोलापूर-जालना, परभणी-बीड, धाराशिव-सिंधुदुर्ग, सांगली- जळगाव, नाशिक-हिंगोली, रत्नागिरी-लातूर, धुळे- छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर-नांदेड.

 

मुली : धाराशिव -परभणी, नाशिक-नंदुरबार, सांगली-सिंधुदुर्ग, जालना- हिंगोली, पालघर-जळगाव, सोलापूर-बीड, रत्नागिरी-नांदेड.

 

*सायंकाळ सत्र :*

कुमार : पालघर-जालना, पुणे-बीड, रायगड-सिंधुदुर्ग, सातारा-जळगाव, नंदुरबार-हिंगोली, मुंबई-लातूर, ठाणे- छत्रपती संभाजीनगर, मुंबई उपनगर-नांदेड.

 

मुली : लातूर-रायगड, सातारा -परभणी, छत्रपती संभाजी नगर-नंदुरबार, धुळे-सिंधुदुर्ग, ठाणे-हिंगोली, मुंबई उपनगर-रायगड, पुणे- जळगाव, अहमदनगर-बीड, मुंबई-नांदेड.

—–